शिरसोलीतील दोन्ही गावे सक्तीने बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 12:21 PM2020-05-12T12:21:38+5:302020-05-12T12:21:51+5:30

शिरसोली : शिरसोली जळगाव जवळ असल्याने या गावात कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ...

 Both the villages in Shirsoli will be closed forcibly | शिरसोलीतील दोन्ही गावे सक्तीने बंद राहणार

शिरसोलीतील दोन्ही गावे सक्तीने बंद राहणार

googlenewsNext

शिरसोली : शिरसोली जळगाव जवळ असल्याने या गावात कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शिरसोली प्र. बो व प्र. नं. ही दोन्ही गावे पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहेत.
ग्रामस्थांनी याचे तंतोतंत पालन करावे; अन्यथा पाच हजार रुपये दंड आकरण्यात येईल, असे ग्रामपंचायतीने कळविले आहे. दरम्यान, उघडी असलेली दुकाने व हातगाड्या तडकाफडकी बंद करण्यात आल्या आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. जळगाव जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये होता. परंतु १ मे पासून काही ठराविक उद्योगधंदे व आस्थापने सुरू करण्याची परवानगी मिळाल्याने प्रत्येक ठिकाणी पहिल्यासारखी गर्दी उसळली. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत जाऊन ती आज १७२ला भिडली आहे. अशा परिस्थितीत खऱ्या लॉकडाउनची गरज आता असताना सगळीकडे गर्दी होताना दिसत आहे. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी नव्याने आदेश काढून रविवारपासून जळगाव शहरात पुन्हा लॉकडाउनच्या कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिरसोलीही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिरसोली हे गाव जळगावपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असून येथील दोन्ही गावांची लोकसंख्या व दाटवस्ती पाहता या गावाला कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शिरसोली प्र. बो. व शिरसोली प्र. नं. या दोन्ही गावच्या ग्रामपंचायतीनी उघडी असलेली आस्थापने, दुकाने व हातगाड्या १७ मेपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या असून जो कुणी दुकान उघडेल, त्याला पाच हजारांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे.
ग्रामविकास अधिकारी मेघश्याम बडगे, रामभाऊ भिल, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाटील, भागवत ताडे, गोरख बारी, श्रीराम ताडे, पोलीस पाटील शरद पाटील यांनी प्रत्येक दुकानात जाऊन ते बंद करण्याची ताकीद दिली.

शिरसोलीत शुकशुकाट
सकाळी ११ वाजेच्या सुमारास मेडीकल व किराणा दुकाने वगळता सर्व दुकाने व हातगाड्या बंद केल्याने शिरसोली येथील बाजार विभाग व गावात शुकशुकाट पहावयास मिळाला.

Web Title:  Both the villages in Shirsoli will be closed forcibly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.