‘बॉटनीकल गार्डन’ चाळीसगावची नवी ओळख ठरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 04:02 PM2018-12-25T16:02:14+5:302018-12-25T16:06:16+5:30
कला, संशोधन आणि उद्योग क्षेत्रामुळे चाळीसगावची ख्याती सातासमुद्रापार पोहचलीय. चाळीसगाव महाविद्यालयात साकारलेले डॉ. विनोद कोतकर बॉटनीकल गार्डन चाळीसगावची नवी ओळख ठरणार असल्याचा अभिप्राय राज्यभरातून आलेल्या विज्ञान अभ्यासकांनी व्यक्त केला. सोमवारी विज्ञान अभ्यासकांनी सहलीच्या निमित्ताने गार्डनला भेट दिली.
चाळीसगाव, जि.जळगाव : कला, संशोधन आणि उद्योग क्षेत्रामुळे चाळीसगावची ख्याती सातासमुद्रापार पोहचलीय. चाळीसगाव महाविद्यालयात साकारलेले डॉ. विनोद कोतकर बॉटनीकल गार्डन चाळीसगावची नवी ओळख ठरणार असल्याचा अभिप्राय राज्यभरातून आलेल्या विज्ञान अभ्यासकांनी व्यक्त केला. सोमवारी विज्ञान अभ्यासकांनी सहलीच्या निमित्ताने गार्डनला भेट दिली.
२२ ते २४ असे तीन दिवसीय अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेचे ५३वे अधिवेशन येथे पार पडले. सोमवारी ११० विज्ञान अभ्यासकांनी सहलीतून मौज अनुभवली. त्यांनी शहरातील केकी मूस कलादालन, डॉ. कोतकर बॉटनीकल गार्डन व वेरुळ येथे भेटी दिल्या.
तालुकास्तरावर इतक्या चांगल्या प्रकारे विविधतेने नटलेले व दुर्मिळ वनस्पतींनी सजलेले गार्डन बघायला मिळणे, हा एक अविस्मरणीय अनुभव असल्याचे मुंबई विज्ञान परिषदेच्या कार्यकारीणीचे सदस्य विनायक कर्र्णिक यांनी सांगितले. नासाने सुचविलेल्या सर्वाधिक आॅक्सिजन देणाºया १६ वनस्पतींनी सज्ज असले ‘आॅक्सी-हब) ही बॉटनीकल गार्डनची एक वेगळी ओळख असल्याचे रत्नागिरी अभ्यासक येथील प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी म्हटले.
याप्रसंगी मुंबई येथे कार्यरत व संस्थेचे माजी विद्यार्थी अभय यावलकर यांचा सत्कार करण्यात आला. वनस्पती विभागप्रमुख प्रा.डॉ .प्रकाश बाविस्कर यांनी उद्यानाविषयी सविस्तर माहिती दिली. संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल, संस्थाध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, सचिव डॉ.विनोद कोतकर, अॅड. प्रदीप अहिरराव, डॉ.सुनील राजपूत, प्रा.ल.वि.पाठक, डी.टी.पाटील, सी.सी.वाणी, डॉ.चेतना कोतकर, उपप्राचार्य डॉ. अजय काटे, प्रा.ऊंदिरवाडे, हिलाल पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.