व्हीआयपी क्रमांकाच्या वाहनात मद्याच्या बाटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 12:43 PM2020-04-28T12:43:23+5:302020-04-28T12:44:30+5:30

जळगाव : तपासणीसाठी गाडी थांबविली असता, पळण्याच्या प्रयत्नातील व्हीआयपी क्रमांकाच्या चारचाकीला पोलिसांनी पाठलाग करुन चंदू आण्णानगरजवळ पकडले. या वाहनात ...

Bottles of alcohol in a VIP numbered vehicle | व्हीआयपी क्रमांकाच्या वाहनात मद्याच्या बाटल्या

व्हीआयपी क्रमांकाच्या वाहनात मद्याच्या बाटल्या

googlenewsNext

जळगाव : तपासणीसाठी गाडी थांबविली असता, पळण्याच्या प्रयत्नातील व्हीआयपी क्रमांकाच्या चारचाकीला पोलिसांनी पाठलाग करुन चंदू आण्णानगरजवळ पकडले. या वाहनात मद्याच्या २२७ बाटल्या आढळून आल्या. त्याची किंमत १७ हजार रुपये आहे. सोमवारी सायंकाळी तालुका पोलिसांची ही कारवाई केली.
याप्रकरणी शुभम साहेबराव पाटील (रा. खोटे नगर) व आकाश कैलास कुंभार (रा. आशाबाबा नगर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महामार्गावर निमखेडी टी पॉईंट याठिकाणी पोलीस कर्मचारी दीपक कोळी व शाम बोरसे कर्तव्य बजावत होते. सोमवारी सायंकाळी एम.एच.२४ ए.एफ१९१९ या व्हीआयपी क्रमाकांची चारचाकी आली. तपासणीसाठी कर्मचाऱ्यांनी गाडी थांबविली. चालकाने चारचाकी पळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी पाठलाग करुन चंदूआण्णानगराजवळ ही चारचाकी पकडली.
गाडीत मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. यात १७ हजाराचे मद्य, २ मोबाईल व वाहन असा २ लाख ३७ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवीकांत सोनवणे यांनी दिली.

Web Title: Bottles of alcohol in a VIP numbered vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव