९८ वर्षांच्या वडिलांसह मुलाने घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:29 AM2021-03-13T04:29:49+5:302021-03-13T04:29:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रहिवासी ह.भ. प बळीराम सोमा जंगले (९८) यांनी शुक्रवारी सायंकाळी कोरोना प्रतिबंधक लस ...

The boy, along with his 98-year-old father, was vaccinated | ९८ वर्षांच्या वडिलांसह मुलाने घेतली लस

९८ वर्षांच्या वडिलांसह मुलाने घेतली लस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील रहिवासी ह.भ. प बळीराम सोमा जंगले (९८) यांनी शुक्रवारी सायंकाळी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. विशेष बाब म्हणजे त्यांचे चिंरजीव केशव जंगले यांचेही वय ६२ असल्याने त्यांनीही वडिलांसोबत लस घेऊन घाबरू नका, लस घ्या व कोरोनाला हरवा, असा संदेश अन्य नागरिकांना दिला आहे.

कोरोनाचा संसर्ग जेव्हा जळगावात सुरू झाला तेव्हापासून जळगाव निवासी डोंगर कठोरेकर ह. भ. प बळीराम जंगले यांनी कोरोनाला प्रतिबंध म्हणून यावर उपाय म्हणून काहीतरी असावे, असा त्यांचा आग्रह होता. कांताई नेत्रालय येथील केंद्रात जावून शुक्रवारी सायंकाळी लस घेतली. आम्हाला कुठलाही त्रास झाला नाही. कोरोनापासून सुरक्षेसाठी लस आवश्यक असून सर्वांनी न घाबरता ही लस घ्यावी असा संदेश बळीराम जंगले व केशव जंगले यांनी दिला आहे.

फोटो आहे.

Web Title: The boy, along with his 98-year-old father, was vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.