पतंग उडविताना तोल गेल्याने मुलगा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:53 AM2019-01-17T00:53:57+5:302019-01-17T00:54:10+5:30
२५ फुटावरून पडून गंभीर
Next
चोपडा : मोहिदा. ता चोपडा येथील ओम मनोहर पाटील (१२) हा पतंग उडविताना तोल गेल्याने तो २५ फुटावरून पडून गंभीर जखमी झाला.
मोहिदा येथील सरपंच मनोहर पाटील यांचा मुलगा व शिरपूर येथील मुकेश आर पटेल विद्यालयाचा इयत्ता सहावीवीत शिक्षण घेणारा विद्यार्थी ओम पाटील मोहिदा येथे आपल्या घराच्या गच्चीवर पतंग उडवित होता.
त्यास आजोबांनी हाक मारली असता तो घाबरला व त्यास गच्चीच्या कोपऱ्यावर उभा असल्याचा अंदाज न आल्याने त्याचा तोल गेला.
खाली पडल्याने ओमट्या दाढी व चेहºयास मार लागला असून डोक्यासही दुखापत झाली आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेने पालकवर्गांमध्ये चिंता पसरली.