सिमेंट टॅंकरचे चाक निखळून दुचाकीवर आदळल्याने मुलगा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 22:29 IST2021-05-23T22:29:26+5:302021-05-23T22:29:50+5:30
साकेगावनजीक महामार्गावर झालेल्या अपघातात मुलगा ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजता घडली.

सिमेंट टॅंकरचे चाक निखळून दुचाकीवर आदळल्याने मुलगा ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : भरधाव सिमेंट टॅंकरचे (बल्कर) मागील चाक अचानक निखळून ते दुभाजक ओलांडून दुचाकीवर आदळले. यात दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार झाल्याची रविवारी दुपारी १ वाजता साकेगावनजीक महामार्गावर घडली.
बादल गोकुळ सोनार (१७, रा. धनगरवाडा, साकेगाव ता. भुसावळ) असे या मुलाचे नाव आहे. एकुलत्या मुलाच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. बादल हा नाहाटा महाविद्यालयातील ११ वी कॉमर्सला शिकत होता.
दुपारी एक वाजेच्या सुमारास सिमेंट बलकरचे मागील दोन चाके अचानक निखळली. यातील एक चाक दुभाजक ओलांडून चौधरी मोटर्सजवळ बंद दुचाकीवर बसलेल्या बादलच्या अंगावर जाऊन आदळले. चाकाचा वेग एवढा होता की बादल हा ३० फुटापर्यत फेकला गेला. जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुसरे चाक शेजारीच नाल्यात जाऊन पडले. अपघात घडताच बल्करवरील चालक व क्लिनर हे पसार झाले.