चाळीसगाव पं.स.सभेवर राष्ट्रवादी सदस्यांचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:30 AM2018-12-25T00:30:04+5:302018-12-25T00:33:47+5:30
शौचालयांच्या कामांबाबत चौकशी समितीची मागणी करुनही पुर्तता होत नसल्याचे कारण पुढे करतांनाच कार्यालयात सभापती उपस्थित राहत नसल्याने कर्मचारी देखील गैरहजर राहतात. यामुळे जनतेची कामे खोळंबळी आहे. असे निवेदन देऊन पंचायत समितीमधील राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सोमवारी झालेल्या सभेवर बहिष्कार टाकला.
चाळीसगाव : शौचालयांच्या कामांबाबत चौकशी समितीची मागणी करुनही पुर्तता होत नसल्याचे कारण पुढे करतांनाच कार्यालयात सभापती उपस्थित राहत नसल्याने कर्मचारी देखील गैरहजर राहतात. यामुळे जनतेची कामे खोळंबळी आहे. असे निवेदन देऊन पंचायत समितीमधील राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सोमवारी झालेल्या सभेवर बहिष्कार टाकला.
सोमवारी दुपारी पं.स.च्या सभागृहात मासिक सभा ठेवण्यात आली होती. राष्ट्रवादीचे गटनेते अजय पाटील यांच्यासह सदस्य भाऊसाहेब केदार, शिवाजी संपत सोनवणे, लता बाजीराव दौंड, सुनिता जिभाऊ पाटील यांनी सभापती व गटविकास अधिका-यांना निवेदन देऊन सभात्याग केला.
शौचालय कामांबाबत मागील सभेत चौकशी समिती नेमण्याच्या निर्णय होऊनही त्याची पुर्तता झाली नाही. २९ नोव्हेंबरच्या पत्रात अजय पाटील यांनी पं.स.च्या सहा विभागाची माहिती मागितली होती. लेखी पत्र देऊनही विभागांची माहिती दिली गेली नाही. सभापती कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने घरकुल, गोठाशेड आदी योजनांची कामे थांबली आहेत. तसेच यामुळे कर्मचारी देखील कार्यालयात हजर राहत नाही. ग्रामीण भागातील जनतेला कामासाठी चकरा माराव्या लागतात. अहिल्यादेवी होळकर सिंचन विहीर योजनेतर्गत दिल्या जाणा-या विहीरींच्या प्रशासकीय मान्यता देऊन दीड वर्ष उलटूनही यातील ४८१ लाभार्थ्यांना वर्कआॅर्डर दिल्या गेल्या नाहीत. चौकशी अहवालही दिला नाही. अशा बाबी निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.