आमदारांच्या गावात मतदानावर बहिष्कार
By admin | Published: February 17, 2017 12:33 AM2017-02-17T00:33:03+5:302017-02-17T00:33:03+5:30
तामसवाडी : तब्बल सहा तास बहिष्कार, गारपीटग्रस्त शेतक:यांना नुकसान भरपाई मिळण्याची होती मागणी
पारोळा/तामसवाडी : गारपीटग्रस्त शेतक:यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या तामसवाडी गावातील 153 शेतकरी कुटुंबांनी आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर सहा तास बहिष्कार टाकला होता. तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण केले. निवडणूक निर्णय अधिकारी व आमदार डॉ. सतीश पाटील यांनी उपोषणकत्र्याची समजूत काढल्याने, त्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला.
5 मे 2016 रोजी तामसवाडी परिसरात वादळी वा:यासह गारपीट झाली होती. त्यात फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान भरपाईची मागणी करूनही त्याकडे शासनाने लक्ष दिलेले नव्हते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक:यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. दिलेल्या इशा:यानुसार आज शेतक:यांनी तब्बल सहा तास मतदानावर बहिष्कार टाकला.
ग्रामस्थांच्या उपोषणाची व मतदानावर बहिष्काराची प्रशासनाने तत्काळ दखल घेतली. दुपारी दीड वाजता प्रांताधिकारी राजेंद्र कचवे मंडपात पोहचले. त्यांनी शासनाच्या वतीने शेतक:यांना मतदान करा बहिष्कार मागे घ्या अशी विनंती केली. तसेच 23 फेब्रुवारीनंतर तुम्हाला शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देऊ, असे आश्वासन दिले. त्यानंतर काही वेळेतच आमदार डॉ. सतीश पाटील मंडपात पोहचले. त्यांनी प्रांताधिका:यांकडून कशा पद्धतीने कार्यवाही सुरू आहे हे जाणून घेतले.
त्यानंतर डॉ. सतीश पाटील म्हणाले की, शासनाला शेतक:यांच्या प्रश्नांकडे लक्ष घालायला वेळ नाही. शासकीय अधिका:यांकडून गारपीटग्रस्त शेतक:यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी अडचणी येत असतील, तर येणा:या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून सर्व शेतक:यांचे प्रश्न मार्गी लावू. सगळ्यांनी बहिष्कार सोडा आणि मतदान करा. यावर सर्व शेतक:यांचे एकमत झाले. शेतक:यांनी उपोषण व बहिष्कार मागे घेतला. दुपारी दोन वाजेनंतर गारपीटग्रस्त शेतक:यांनी सहकुटुंब मतदान केले. बहिष्कार मंडपात शेतक:यांच्या प्रश्नांना पाठिंबा देण्यासाठी शिक्षकनेते ह.म. पवार, शिवसेना तालुकाध्यक्ष आर.बी. पाटील, पारोळ्याचे अॅड.अण्णासाहेब पवार, नगराध्यक्ष करण पवार आदींनी भेट दिली.
या आंदोलनात मनोहर लिंगायत, प्रदीप लिंगायत, सोनू पवार, पवन पवार, रमेश माळी, संभाजी बेलदार, विजय सोनार, भानुदास पवार, आनंदा बिरारी, शिवाजी माळी, संजय बेडिस्कर, प्रकाश पवार, पी.पी.पवार, अण्णा पंडित, श्रीराम पिरन पाटील, शांताराम माळी, देवीदास वाघ, एकनाथ चौधरी, राजधर पवार, डॉ.प्रशांत बागुल, प्रशांत कुलकर्णी यांच्यासह शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते.
(वार्ताहर)
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी चार मतदान केंद्र होते. या ठिकाणी 4951 मतदार होते. नुकसानग्रस्त शेतक:यांव्यतिरिक्त इतर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
4गावात अगदी शांततेत मतदान झाले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस कर्मचा:यांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. दुपारी या नुकसानग्रस्त शेतक:यांनाही आगामी काळात मदत मिळवून देण्याचे आश्वासन मिळाल्याने, त्यांनीही मतदानाचा हक्क बजावला.