पारोळ्यात ब्रह्मोत्सवाची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 04:58 PM2019-09-18T16:58:47+5:302019-09-18T16:58:51+5:30

पारोळा : गेल्या ३८० वषार्ची परंपरा असलेल्या बालाजी संस्थानाच्या वतीने या वर्षीही २९ सप्टेंबरपासून सुरू होणा?्या ब्रह्मोत्सव वहन रथोत्सवासाठी ...

The Brahmotsavagi bag in Parola | पारोळ्यात ब्रह्मोत्सवाची लगबग

पारोळ्यात ब्रह्मोत्सवाची लगबग

Next



पारोळा : गेल्या ३८० वषार्ची परंपरा असलेल्या बालाजी संस्थानाच्या वतीने या वर्षीही २९ सप्टेंबरपासून सुरू होणा?्या ब्रह्मोत्सव वहन रथोत्सवासाठी बाहुले दुरुस्तीसह रंगकामाला वेग आला आहे.
शालिक लोहार हे बाहुल्या दुरुस्तीचे काम करीत आहेत. त्यांना रमेश शिंपी व इतर सेवेकरी मदत करतात. ब्रह्मोत्सवात दररोज वहनावर आकर्षक बाहुले ठेवले जाते. तसेच श्री बालाजी महाराजांची मूर्ती आरूढ होऊन त्यांची शहराच्या मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात येते.
रथावरील राक्षस, घोडे, सारथी अर्जुन, गरुड, अंगद, मारुती, इंद्रसभा, हत्ती, मोर, कपी सेना, संतमेळा अशी हुबेहूब दिसणारी १६२ बाहुले आहेत. त्यांची दुरूस्ती गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. या ब्रह्मोत्सवाने शहरातील वातावरण भक्तीमय होत असते.
रथाला जागेवरून बाहेर काढताना अडचण होऊ नये म्हणून यावर्षी रथाला जागेवर फिरविता यावे म्हणून जॅकची व्यवस्था करण्यात येत आहे. अशा सर्व कामांच्या लगबगीत भाविक दंग आहेत.

 

Web Title: The Brahmotsavagi bag in Parola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.