आचारसंहिता भंग ; तिघांविरूध्द पोलिसात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 09:24 PM2019-09-23T21:24:20+5:302019-09-23T21:25:03+5:30

जळगाव - विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे़ यातच राजकीय पक्षाच्या वाढदिवसाचे फलक आकाशवाणी ...

 Breach of code of conduct; Police offense against all three | आचारसंहिता भंग ; तिघांविरूध्द पोलिसात गुन्हा

आचारसंहिता भंग ; तिघांविरूध्द पोलिसात गुन्हा

Next

जळगाव- विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे़ यातच राजकीय पक्षाच्या वाढदिवसाचे फलक आकाशवाणी चौकात आढळून आल्याने तीन जणांविरूध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आचारसंहिता लागू झाल्यावर जळगाव महानगरपालिकेने शहरातील सर्व राजकीय संघटनेचे पोस्टर्स, बॅनर, झेंडे, फलक आणि मतदारांवर प्रभाव पडेल अशा सर्व वस्तू हटविण्यात आल्या होत्या. दरम्यान, शहरातील आकाशवाणी चौकात सामाजिक वनिकरण विभागाच्या हद्दीत त्यांच्या मालकीच्या होर्डींगवर आचार संहिता असतांना सोमवारी सकाळी नीलेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाबाबत शिवसेना पक्षाच्या व्यक्तीसोबतचे फोटोंचे होडींग लावल्याप्रकरणी आचार संहिता भंग गेली. याप्रकरणी किरकोड वसुली विभागाचे लिपीक अजय उध्दव बिºहाडे यांच्या फियार्दीवरून सामाजिक वनिकरण विभागाचे विभागीय वनधिकारी, शिवसेनेचे नीलेश पाटील आणि साईमोह क्रियेशन एडव्हरटायझर यांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलीसात लोकप्रतिनिधी नियम कलम १२६ सह महाराष्ट्र विद्रपीकरण अधिनियम सन १९९५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title:  Breach of code of conduct; Police offense against all three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.