महामार्र्गांच्या कामास अतिक्रमणांचा बे्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:42 PM2019-11-26T12:42:44+5:302019-11-26T12:42:51+5:30

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासह जळगाव -औरंगाबाद तसेच जळगाव-पाचोरा मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामध्ये अतिक्रमणांचा अडथळा येत असल्याची ...

 Breach of encroachment on the work of highways | महामार्र्गांच्या कामास अतिक्रमणांचा बे्रेक

महामार्र्गांच्या कामास अतिक्रमणांचा बे्रेक

Next

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासह जळगाव-औरंगाबाद तसेच जळगाव-पाचोरा मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामध्ये अतिक्रमणांचा अडथळा येत असल्याची बाब सोमवारी झालेल्या बैठकीत समोर आली. यामध्ये नगरपालिका, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्थांच्या भिंती, त्यांच्या मालकीची संकूल, जलवाहिन्यांचा समावेश असून काही धार्मिक ठिकाणी स्थळेही मध्ये येत असल्याचे समोर आले. ही सर्व अतिक्रमणे काढण्याविषयी उपाययोजना करून महामार्गाचे कामे वेगाने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, औरंगाबाद मार्गाचे काम गतिमान करण्याच्याही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
चौपदरीकरणाच्या कामातील अडथळ्यांसंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्या वेळी अधिकाºयांनी भूसंपादन, अतिक्रमण या विषयी समस्या मांडल्या. तरसोद ते चिखली दरम्यानच्या कामामध्ये भुसावळ येथील शहीद स्मारक रस्त्याच्या कामाच्यामध्ये येत असून या सोबतच भुसावळ न.पा.ची पाण्याची टाकी अडथळा ठरत आहे़ काही ठिकाणी आमदार निधीतील हायमास्ट दिवेही अडथळा ठरत आहेत. भुसावळमध्येच नवोदय विद्यालयाची भिंतही रस्त्याच्या कामात येत असून वरणगाव येथे जलवाहिनीची क्रॉसिंग अडथळा ठरत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. हे सर्व अडथळे एक महिन्यात स्थलांतरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या.
सालबर्डी ग्रामपंचायतीचे व्यापारी संकूलाचाही अडथळा असल्याने संबंधित बांधकामाचे पैसे ग्रामपंचायतला देऊन ते पाडण्याविषयी सूचना देण्यात आल्या. या सोबतच घोडसगाव-चिखली ग्रामपंचायतचे शौचालयदेखील रस्त्यात येत असल्याने त्याचा मोबदला देऊन ते बांधकाम काढण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Web Title:  Breach of encroachment on the work of highways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.