बेकायदा दारू विक्री करणारे जाळ्यात
By admin | Published: April 1, 2017 12:27 AM2017-04-01T00:27:20+5:302017-04-01T00:27:20+5:30
सहायक अधीक्षकांची धडक कारवाई : 16 हजारांची देशी-विदेशी दारूसह गुटखाही जप्त
भुसावळ : देशी- विदेशी दारूची बेकायदा विक्री करणा:यांवर सहायक पोलीस अधीक्षक नीलोत्पल व सहका:यांनी शुक्रवारी सायंकाळी धडक कारवाई केल्याने अवैध धंदेचालकांमध्ये खळबळ उडाली आह़े चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 16 हजार रुपये किमतीची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आह़े
आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून बेकायदा दारूची विक्री करीत असल्याची तक्रार सहायक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्याकडे निनावी अर्जाद्वारे करण्यात आली होती़ तक्रारीची दखल घेत शुक्रवारी सायंकाळी स्वत: नीलोत्पल यांनी कारवाई केली़
चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या
पहिली कारवाई शहर पोलीस ठाणे हद्दीतील शहरातील न्यू पोर्टर चाळ भागातील सोमनाथ मंदिरामागे करण्यात आली़ शैलेश अशोक जाधव यास अटक करण्यात आली तर मुख्य आरोपी बानोबी मोहम्मद सलीम ही पसार झाली आह़े आरोपीच्या घरातून 14 हजार 290 रुपये किमतीच्या विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या़ त्यात तीन हजार रुपये किमतीची पिशव्यांमध्ये भरलेल्या गावठी दारूचा समावेश आह़े
बाजारपेठ हद्दीतील तीन कारवाया
बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत स्वतंत्र तीन कारवाया करून गुन्हे दाखल करण्यात आल़े संजय पाटील यांच्या फिर्यादीनुसार भीमराव जानू इंगळे (72, वाल्मीकनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ त्याच्या ताब्यातून 900 रुपये किमतीची 30 लीटर गावठी दारू जप्त करण्यात आली़
दुसरी फिर्याद संकेत झांबरे यांनी दिल्यावरून कैलास पंडित सोवणे (44, रमाबाई आंबेडकरनगर, भुसावळ) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ त्याच्या ताब्यातून 900 रुपये किमतीची 30 लीटर गावठी दारू जप्त करण्यात आली़
तिसरी फिर्याद संजय पाटील यांनी दिल्यावरून श्रावण रमेश देवरे (30, रमाबाई आंबेडकरनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ त्याच ताब्यातून 600 रुपये किमतीच्या संत्रा लेबल लिहिलेल्या 12 बाटल्या जप्त करण्यात आल्या़
गोपनीय कारवाईत यांचा सहभाग
4कारवाईत सहायक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, उपनिरीक्षक युवराज अहिरे, एएसआय दिलीप कोळी, हवालदार संजय जाधव, हवालदार प्रदीप पाटील, संदीप चव्हाण, विशाल सपकाळे, सुनील शिंदे, शालिनी वलके, आशा तडवी, संजय पाटील, संकेत झांबरे, हशमतअली सैयद, राजेश काळे आदींच्या पथकाने केली़
महामार्गावरील परमीट रूम बंद झाल्याने केला साठा
431 रोजी मध्यरात्री राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील परमीट रूम, वाईन शॉप, बियर शॉपी आदी बंद होणार असल्याने संशयित आरोपींनी मद्याचा बेकायदा साठा केला असल्याचा पोलिसांना संशय आह़े विशेष म्हणजे ड्राय डे च्या दिवशी शहरात अनेक जण बेकायदा दारू विक्री करीत असल्याची ओरड असल्याने त्या पाश्र्वभूमीवरही कारवाई झाली आह़े
25 हजारांचा विमल गुटखाही केला जप्त
4शहर हद्दीतील न्यू पोर्टर चाळीतून बंदी असलेल्या विमल गुटख्याच्या 2500 गुटख्याच्या पुडय़ा पोलिसांनी जप्त केल्या आहेत़ अन्न व औषध प्रशासनाकडे त्या शनिवारी देण्यात येणार आहेत़