गरिबांच्या भाकरीवरचं तेल गेलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 03:34 PM2019-12-24T15:34:46+5:302019-12-24T15:36:43+5:30

आजपर्यंतच्या इतिहासामध्ये न भुतो असं सोयाबीन तेलाने यंदा सर्व रेकॉर्ड ब्रेक करत प्रति किलो शंभरी गाठली आहे.

The bread of the poor went on oil | गरिबांच्या भाकरीवरचं तेल गेलं

गरिबांच्या भाकरीवरचं तेल गेलं

googlenewsNext
ठळक मुद्देसोयाबीनने गाठली प्रति किलो शंभरीआतापर्यंतचा उच्चांक

वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : आजपर्यंतच्या इतिहासामध्ये न भुतो असं सोयाबीन तेलाने यंदा सर्व रेकॉर्ड ब्रेक करत प्रति किलो शंभरी गाठली आहे. यामुळे गरिबाच्या चटणीवरचं तेलही गेलं आणि कांद्याने शंभरी गाठल्याने चटणीही गेली आहे.
कधी नव्हे असा यंदा सोयाबीन तेलाने महागाईत उच्चांक गाठला आहे. अगदी दोन दिवसांपूर्वी ८५ रुपये प्रति किलो असलेले सोयाबीन तेल आज १०२ रुपये प्रतिकिलो किरकोळ बाजारात विकले गेले. कांद्याने यंदा शंभरी गाठली होती. गरिबांची मदार सोयाबीन तेल व कांद्याच्या चटणीवर असते. सोयाबीन व कांद्याने शंभरी गाठल्यामुळे गरिबांच्या चटणीवर तेलही गेलं, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे.
पाच-सहा दिवसांपूर्वी १५ किलोचा सोयाबीनचा डबा १३२० रुपयांप्रमाणे विक्री होत होता. २३ रोजी तोच डबा १५३० रुपयांपर्यंत पोहोचला.
यंदा पावसाळ्यानंतरही सातत्याने पडलेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीनच्या पिकावर याचा परिणाम झाला. नेहमीच्या उत्पादनाच्या तुलनेत यंदा कमी उत्पन्न झाले आणि सोयाबीनची आवक कमी झाली. यामुळे भाववाढ झाल्याची बाजारपेठेत व्यापारी वर्गातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
दरम्यान, थंडीच्या सोयाबीन तेलामध्ये पामतेलाची भेसळ होत नसल्याने सोयाबीनचे भाव तर वाढले नाही ना, असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

अवकाळी पावसाच्या परिणामामुळे सोयाबीनचे उत्पन्न कमी झाले आहे. बाजारात आवक कमी झाल्याचा परिणाम म्हणून सोयाबीन तेलाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. कधी नव्हे एवढा उच्चांक सोयाबीन तेलाने यंदा गाठला आहे.
-निर्मल कोठारी, घाऊक तेल विक्रेते, भुसावळ
 

Web Title: The bread of the poor went on oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.