कोरोनाची साखळी तोडा, डीजे जप्त करून वधू-वर पित्यावर गुन्हा दाखल करा-आमदार अनिल पाटील यांचे आढावा बैठकीत निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 03:24 PM2021-03-19T15:24:21+5:302021-03-19T17:02:36+5:30

कोरोना साखळी तोडण्याचे आढावा बैठकीत आवाहन करण्यात आले.

Break the chain of corona, seize the DJ and file a case against the father of the bride-groom-MLA Anil Patil's instructions in the review meeting | कोरोनाची साखळी तोडा, डीजे जप्त करून वधू-वर पित्यावर गुन्हा दाखल करा-आमदार अनिल पाटील यांचे आढावा बैठकीत निर्देश

कोरोनाची साखळी तोडा, डीजे जप्त करून वधू-वर पित्यावर गुन्हा दाखल करा-आमदार अनिल पाटील यांचे आढावा बैठकीत निर्देश

Next

अमळनेर : आपले गाव हिटलिस्टवर यायला नको. कोरोनाची साखळी तुटलीच पाहिजे. याकरिता २० मार्चपासून डीजे जप्त करा, वधू- वर पिता यांच्यावरही कारवाई करा, पोलिसांचे चेक पॉईंट लावा, भाजीपाला लिलावातील गर्दी बंद करा. बेजबाबदार समाजकंटकांमुळे जबाबदार नागरिकांना त्रास भोगावा लागत आहे. त्यामुळे कठोर पावले उचलून कारवाई करा, असे सक्त आदेश आमदार अनिल पाटील यांनी कोरोनाच्या आढावा बैठकीत प्रशासनाला दिला. दरम्यान, माजी आमदार साहेबराव पाटील यांनीही प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना या बैठकीत दिल्या.
पंचायत समितीच्या सभागृहात सर्व प्रशासकीय विभागाची आढावा बैठक शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी बंद हाताळण्याबाबत सूचना दिल्या. तसेच यावेळी कोरोन्टाईन रुग्णांवर लक्ष ठेवणे, चाचण्या वाढवणे, कोविड केयर सेंटर अपूर्ण पडल्यास दुसरे सेंटर सुरू करणे, खाजगी दवाखान्यातील परिस्थिती, बसस्थानकात गर्दी, याबाबत आढावा घेण्यात आला. संचारबंदीबाबत चार अधिकारी नेमण्यात आले असून उद्घोषणा करण्यात येत आहे. बिना मास्कधारकांवर कारवाई वाढवण्यात येईल. अवैध व जादा प्रवाशी वाहतुकदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी सांगितले.
विशेष म्हणजे रेमडेसीयरचे जास्त पैसे घेतले जात असतील तर त्या वैद्यकीय सेवाकर्त्यांवरदेखील कारवाई करा. नागरिकांनी देखील तहसीलदारांकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले.
यावेळी डॉ.गिरीश गोसावी व.डॉ प्रकाश ताळे यांनी लसीची संख्या वाढवण्याची मागणी केली. केयर सेंटरला डॉक्टर व परिचारिका स्टाफ उपलब्ध करून देत असल्याची माहिती दिली.
या बैठकीस आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, प्रांताधिकारी सीमा अहिरे, चोपड्याचे प्रभारी प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, डॉ.राजेंद्र शेलकर, डॉ.आशिष पाटील, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, सहायक निबंधक गुलाबराव पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हेमंत महाजन, आगारप्रमुख अर्चना भदाणे, हरीश कोळी , पोलीस नाईक डॉ.शरद पाटील, होमगार्ड समादेशक अरुण नेतकर हजर होते.


आज आढळलेले रुग्ण १०५
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ५२५६
ऍक्टिव्ह रुग्ण ३३९
शहर २६१, ग्रामीण ७८
कोविड हेल्थ सेंटर - ३९
कोविड केयर सेंटर - ००

Web Title: Break the chain of corona, seize the DJ and file a case against the father of the bride-groom-MLA Anil Patil's instructions in the review meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.