नव्या पालकमंत्र्यांना आचारसंहितेचा ‘ब्रेक’
By admin | Published: January 5, 2017 01:12 AM2017-01-05T01:12:26+5:302017-01-05T01:12:26+5:30
जळगाव : जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पहिल्याच जळगाव दौ:याला आचारसंहितेचे विघA आले आहे.
जळगाव : जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पहिल्याच जळगाव दौ:याला आचारसंहितेचे विघA आले आहे. पदवीधर मतदारसंघासाठी होत असलेल्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सर्व शासकीय कार्यक्रम, बैठका रद्द झाल्या.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही महिने पालकमंत्रीपद रिक्त होते. त्यानंतर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली. फुंडकर यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस कार्यक्रम, जामनेर येथील मुख्यमंत्री समाधान शिबिर व जिल्हा नियोजन समितीची सभा हे तीन कार्यक्रम वगळता इतर कार्यक्रमाला उपस्थिती दिली नाही. चंद्रकांत पाटील यांनी जळगाव जिल्ह्यासाठी दर आठवडय़ाला वेळ देणार असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी गुरुवार, 5 रोजी जळगाव दौ:याचे नियोजन केले. यादरम्यान जिल्हा नियोजन समितीची बैठक, महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका:यांची आढावा बैठकही आयोजित केली. मात्र पदवीधर मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू झाल्यामुळे गुरुवारी डांभुर्णी, ता.यावल येथील डॉ.दिवाकर खंडू चौधरी विद्यालयात होणा:या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल वाटप कार्यक्रम, जिल्हा नियोजन समितीची सभा तसेच महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका:यांची आढावा बैठक रद्द झाली आहे. पुढे जि.प. पाहा/7
नव्या पालकमंत्र्यांना आचारसंहितेचा ‘ब्रेक’
निवडणुकीसाठी आचारसंहिता लागूच राहणार असल्याने विकासकामांचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर पडला आहे.
दरम्यान, शासकीय कार्यक्रम रद्द झालेले असले तरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे 5 रोजी सकाळी 6.15 वाजता दाखल होऊन हॉटेलमध्ये थांबणार आहेत. दुपारी 1 वाजता भाजपा कार्यालयातील बैठकीला उपस्थित राहून जिल्हा पदाधिकारी व कार्यकत्र्यासोबत संवाद साधणार आहेत.