वीज पुरवठा खंडित केल्याने मुक्ताईनगर अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 05:10 PM2018-10-23T17:10:04+5:302018-10-23T17:13:00+5:30

मुक्ताईनगर नगरपंचायतीकडे पथदिव्यांच्या वीज पुरवठ्यापोटी वीज वितरण कंपनीचे पावणे दोन कोटी रुपये थकल्याने सोमवार रात्रीपासून शहराचा पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने शहर अंधारात बुडाले होते.

 By breaking the power supply, in Muktainagar darkness | वीज पुरवठा खंडित केल्याने मुक्ताईनगर अंधारात

वीज पुरवठा खंडित केल्याने मुक्ताईनगर अंधारात

googlenewsNext
ठळक मुद्देऐन सणासुदीच्या दिवसात शहरात आफतनगरपंचायत प्रशासनाची उडाली धावपळ

मुक्ताईनगर : नगरपंचायतकडे पथदिव्यांच्या वीज पुरवठापोटी पावणे दोन कोटी रुपयांचे बिल बाकी असल्याने शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा सोमवारी रात्रीपासून खंडीत करण्यात आला आहे. ऐन सणासुदीच्या काळात रस्ते रात्रभर अंधारात होते.
शहरात नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतीस आर्थिक अडचणीचा प्रचंड सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायत अस्तित्वात असतांना जि. प. च्या फंडातून वेळीच दिवाबत्तीचे वीजबिल भरले नसल्याने या थकबाकीला डोंगराचे रूप आले आहे. दरवेळेस वीज खंडीत करण्याची कारवाई होत असताना तात्पुरती रक्कम भरून वेळ मारून नेण्यात येत होती. त्यामुळे आता तब्बल १ कोटी ७७ लाख रुपये वीज बिल थकीत झाले आहे. सोमवारपर्यंत मुदत देऊन ही नगरपंचायतने थकबाकी न भरल्याने सोमवारी रात्री शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने खंडित केला आहे.
१ लाखांचा भरणा
दरम्यान, दिवाळीसारख्या सणासुदींचे दिवस असताना वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नगरपंचायतची धावपळ उडाली आहे. न.पा. फंडात निधी उपलब्ध नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात एक लाख रुपयाचा धनादेश वीज वितरण कंपनीला देण्याची धावपळ नगरपंचायतीत सुरू होती. येथे प्रभारी स्वरूपात देण्यात आलेल्या लेखापालाची कायम नियुक्ती फैजपूर येथे असल्याने त्यांच्या सहीसाठी एक लाखाचा धनादेश घेऊन कर्मचारी फैजपूर येथे दुपारी रवाना झाला आहे. सही झाल्यानंतर हा धनादेश कंपनीकडे जमा करण्यात येणार आहे.

दिवाळीनंतर थकीत वीज बिल भरू अशी विनंती वीज वितरण कंपनीला करण्यात आली आहे. वीज बिलाचा शासनाला प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. परवानगी घेऊन १४ व्या वित्त आयोगातून विज बिल भरण्याचे प्रयत्न आहेत. नगरपंचायतीमध्ये कर वसुली नसल्याने आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. - श्याम गोसावी, मुख्याधिकारी नगरपंचायत

 

Web Title:  By breaking the power supply, in Muktainagar darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज