50 रुपयांची लाचखोरी!
By admin | Published: April 12, 2017 12:19 AM2017-04-12T00:19:06+5:302017-04-12T00:19:06+5:30
न्यायालयात कारकून अटकेत
धुळे : फौजदारी खटल्यातील आरोपीला न्यायालयाने फेटाळलेल्या जामीन अर्जाची प्रमाणित प्रत देण्यासाठी खंडपीठाच्या वकिलांकडून 50 रुपयांची लाच घेताना जिल्हा न्यायालयातील लिपिक नरेंद्र हिरामण सूर्यवंशी यास मंगळवारी दुपारी लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
तात्पुरता जामीन मिळावा म्हणून औरंगाबाद खंडपीठात तात्पुरती दाद मागण्यासाठी जामीन अर्जाच्या आदेशाची प्रमाणित प्रत मिळावी, यासाठी खंडपीठातील वकिलांनी नियमानुसार 49 रुपयांची शासकीय फी भरून अर्ज केला. त्या वेळी लिपिक व लोकसेवक नरेंद्र सूर्यवंशी यांनी 200 रुपयांची लाच मागितली. तक्रारीच्या पडताळणीनंतर एसीबीने मंगळवारी जिल्हा न्यायालयातील अभिलेख कक्षात सापळा लावला. सूर्यवंशी याला 50 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.