२५०० रुपयांची लाच भोवली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 06:08 PM2021-06-23T18:08:51+5:302021-06-23T18:09:21+5:30

दारू व्यवसायावर कारवाई  करु नये, यासाठी २५०० रुपयांची लाच घेणारा पाळधी ता. धरणगाव येथील आऊट पोस्टचा पोलीस व होमगार्ड अशा दोघांना अटक करण्यात आली.

A bribe of Rs | २५०० रुपयांची लाच भोवली 

२५०० रुपयांची लाच भोवली 

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस व होमगार्डला अटक.

लाेकमत न्यूज नेटवर्क

जळगाव :  दारू व्यवसायावर कारवाई  करु नये, यासाठी २५०० रुपयांची लाच घेणारा पाळधी ता. धरणगाव येथील आऊट पोस्टचा पोलीस व होमगार्ड अशा दोघांना अटक करण्यात आली.  बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास दूरक्षेत्राच्या आवारातच ही कारवाई करण्यात आली. 

पोलीस नाईक किरण चंद्रकांत सपकाळे (३७, रा.संत मीराबाई नगर, पिंप्राळा , जळगाव) व होमगार्ड प्रशांत नवल सोनवणे (रा.सोनवद, ता.धरणगाव) अशी या  आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार याच्यावर दाखल गुन्हयातील वॉरंटामध्ये त्यांना मदत करावी तसेच   दारूविक्रीच्या व्यवसायावर परत कारवाई न करण्याच्या मोबदल्यात सपकाळे याने २५०० रुपयांची लाच मागितली. ती सोनवणे याच्याकडे देण्यास सांगितले. सोनवणे याने बुधवारी ही रक्कम घेताच या दोघांना अटक करण्यात आली. 
 

Web Title: A bribe of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.