भुसावळ येथे कोळी समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:48 AM2018-11-12T00:48:21+5:302018-11-12T00:50:31+5:30
कोळी समाजाचा राज्यस्तरीय मेळावा येथील कोळी समाज विकास मंडळाच्या गजानन महाराज नगरातील सभागृहात रविवारी सकाळी पार पडला. मेळाव्यात ४२७ वधू-वरांनी आपला परिचय दिला.
भुसावळ, जि.जळगाव : कोळी समाजाचा राज्यस्तरीय मेळावा येथील कोळी समाज विकास मंडळाच्या गजानन महाराज नगरातील सभागृहात रविवारी सकाळी पार पडला. मेळाव्यात ४२७ वधू-वरांनी आपला परिचय दिला.
अध्यक्षस्थानी भागवत ढेमा सपकाळे होते. प्रमुख अतिथी दिवाकर पाटील, सतीश सपकाळे, वसंत मोंढे, गिरधर कोळी, पन्नालाल सोनवणे, सुधाकर कोळी, रामदास कोळी, व्ही.पी.कोळी, गोपाल तायडे, अरुण कोळी, अरुण सूर्यवंशी, शांताराम बुटे, नीलेश पाटील होते. मान्यवरांच्याहस्ते वाल्मीक ऋषींच्या व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रमुख अतिथी प्रभाकर सोनवणे यांनी मुलींनी नोकरदार मुलांचीच अपेक्षा न ठेवता उद्योजक, शेतकरी यांच्याही अपेक्षा ठेवाव्यात. समाजातील वाढती हुंडा पद्धत, साखरपुडा, मानपान या गोष्टींना फाटा देण्याचे आवाहन केले. चंद्रकांत सूर्यवंशी यांनी, वधु-वरांमध्ये होणाऱ्या वादातून होणारे घटस्फोट टाळण्यासाठी एकमेकांचे विचार समजून घेण्याचे आवाहन केले. वसंत मेढे यांनी मुलींच्या वाढत्या वयाबद्दल खंत व्यक्त केली.
प्रास्ताविक परिचय मेळावा समिती अध्यक्ष भागवत सपकाळे यांनी केले. यशस्वीतेसाठी भागवत सपकाळे, दीपक सोनवणे, महारु पिंप्रीकर, लीलाधर सपकाळे, शांताराम कोळी, दत्तात्रय सपकाळे, उत्तम कोळी, रोहिदास सोनवणे, डॉ. दीवाकर कोळी, प्रदीप सपकाळे, प्रकाश कोळी, मुकेश कोळी, चंद्रकांत सपकाळे, ज्ञानेश्वर सोनवणे, नितीन सोनवणे, वसंत सपकाळे, अभिमन्यू सोनवणे, प्रकाश सपकाळे, उखर्डू सपकाळे, अर्जुन सपकाळे, दिलीप कोळी, ल्ी बाविस्कर, बन्सी मोरे, वसंत मोरे, रवींद्र बाविस्कर विजय तावडे, धर्मराज तायडे यांनी परिश्रम घेतले.