ब्रीज कोर्सची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:12 AM2021-07-04T04:12:43+5:302021-07-04T04:12:43+5:30

जळगाव : वर्षभरापासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी शासनाने ब्रीज कोर्स ...

The bridge course should be implemented effectively | ब्रीज कोर्सची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी

ब्रीज कोर्सची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी

Next

जळगाव : वर्षभरापासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी शासनाने ब्रीज कोर्स तयार केला आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी करावी असे आवाहन अमरावती येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या विषय सहायक सुनीता लहाने यांनी केले.

महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या जळगाव शाखेचा नुकताच ब्रीज कोर्सबाबत ऑनलाइन मार्गदर्शन प्रशिक्षणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे राज्य अध्यक्ष का. रा. तुंगार, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य सचिव प्रकाश देशपांडे, उपाध्यक्ष अशोक मदाने, राज्याचे प्रवक्ते कृष्णा हिरेमठ, टी. के. पाटील, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष हेमंत पाटील यांनी, तर अतिथी परिचय राहुल चौधरी यांनी केला.

शिक्षकांच्या शंकांचे निरसन

ऑनलाईन कार्यक्रमात अमरावती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या विषय सहायक सुनीता लहाने यांनी जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना ब्रीज कोर्सबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. त्यानंतर शिक्षकांच्या शंकांचे निरसन केले. तसेच मुख्य सचिव प्रकाश देशपांडे, उपाध्यक्ष अशोक मदाने, राज्य प्रवक्ते कृष्णा हिरेमठ यांनी मार्गदर्शन केले. अजित चौधरी यांनी सूत्रसंचालन केले, तर जीवन महाजन यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी राहुल चौधरी, देवेंद्र चौधरी, श्याम ठाकरे, तसेच महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: The bridge course should be implemented effectively

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.