रावेर-पुनखेडा मार्गावरील भोकर नदीवरील पूल खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 03:11 PM2019-08-11T15:11:14+5:302019-08-11T15:11:48+5:30
रावेर तालुक्यातील रावेर-पुनखेडा मार्गावर भोकर नदीवरील पूल शुक्रवारी नदीच्या रूद्रावताराने खचला आहे.
किरण चौधरी
रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील रावेर-पुनखेडा मार्गावर भोकर नदीवरील पूल शुक्रवारी भोकर नदीच्या रूद्रावताराने खचला आहे.
रावेर-पुनखेडा दरम्यान भोकर नदीवरील पूल सन २०१४ मध्ये अतिवृष्टीत भोकर नदीच्या महापुरात भगदाड पडून वाहून गेला होता. परिणामी पुनखेडा व पातोंडी येथील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रेल्वेच्या लोखंडी पुलावर जीव धोक्यात घालून पायी ये-जा करावी लागत होती. म्हणून उभय ग्रामस्थांनी तीव्र असंतोष व्यक्त करून तत्कालीन आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे रेटा लावला होता.
त्या अनुषंगाने तत्कालीन आमदार शिरीष चौधरी यांनी तातडीच्या दुरूस्तीच्या उपाययोजनांसाठी व नवीन पुलाच्या उभारणीसाठी पाठपुरावा करून त्या पुलाची तातडीची दुरूस्ती केली होती. आमदार हरिभाऊ जावळे हे त्यानंतर विधानसभेवर निवडून आल्यानंतर त्यांनीही या पुलाच्या नव्याने उभारणीसाठी बांधकाम मंत्रालयाकडे सादर केला होता. गत पावणे पाच वर्षांत त्या प्रस्तावावर अनेकदा फेरप्रस्ताव पाठवण्यात आले. किंबहुना त्या पुलावरून जाणाऱ्या रावेर - पुनखेडा ते पातोंडीपर्यंतच्या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत नव्याने डांबरीकरण करण्यात आले. रस्ता डांबरीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा वापर करीत असताना गत चार पाच वर्षांंपासून भिजत घोंगडे पडलेल्या या व्हेंटीलेटरवर अंतिम घटका मोजत असलेल्या पुलाचा संबंधित लोकप्रतिनिधी व जि.प. बांधकाम विभागाची मालमत्ता असलेल्या या रस्त्यावर डांबरीकरण करणाºया सार्वजनिक बांधकाम विभागाला तरी कसा विसर पडला, असा औत्सुक्याचा सवाल उपस्थित केला जात आहे.
गत साडेचार ते पावणे पाच वर्षांत रावेरहून मुक्ताईनगरकडे सातत्याने जाणाºया खासदार रक्षा खडसे, तथा आता विधानसभा सदस्यत्वाचा मावळतीचा कार्यकाळ नजीक येवून ठेपला असताना दोघाही लोकप्रतिनिधींना अंतिम घटका मोजत असलेल्या या व्हेंटीलेटरवरील पुलाला नवसंजीवनी देण्याची गरज का भासली नाही, असा संतप्त सवाल व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, आभोडा व मंगरूळ धरणांमधून खळाळून वाहणाºया विसर्गाने रूद्रावतार धारण केल्याने शुक्रवारी रावेर-पुनखेडा रस्त्यावरील पूल खचला.
रावेर पोलिसांनी या खचलेल्या पुलावर बॅरीकेटस लावून वाहतुकीसाठी बंद केल्याने या पुलावरून अवजड वाहनांची रहदारी थांबवण्यात आली होती. परिणामत: शनिवारी सकाळी अंतुर्ली, धुरखेडा व मुक्ताईनगरकडे जाणाºया एस.टी. बससेवा खंंडित करण्यात आली होती. यामुळे पुनखेडा व पातोंडी येथील विद्यार्थ्यांना रावेरपर्यंत पायी ये-जा करावी लागली म्हणून पालकांनी व विद्यार्थ्यांनीही तीव्र नापसंती व्यक्त केली. त्या पार्श्वभूमीवर रावेर आगार व्यवस्थापकांनी खबरदारी घेऊन सदरची बससेवा सुरळीत करून विद्यार्थ्यांना दिला