सुकी नदीवरील पूल ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:16 AM2020-12-06T04:16:47+5:302020-12-06T04:16:47+5:30

उटखेडा, ता. रावेर : येथील चिनावल मार्गावरील सुकी नदीच्या पुलावरील खड्ड्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाहनधारकांना ...

The bridge over the dry river is fatal | सुकी नदीवरील पूल ठरतोय जीवघेणा

सुकी नदीवरील पूल ठरतोय जीवघेणा

Next

उटखेडा, ता. रावेर : येथील चिनावल मार्गावरील सुकी नदीच्या पुलावरील खड्ड्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाहनधारकांना वाहन चालविताना हे खड्डे चुकवत जावे लागते. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. हे खड्डे जीवघेणे होत असून, या ठिकाणी अपघात झाल्यास कोण जबाबदार राहील, असा प्रश्न वाहनधारकांकडून उपस्थित होत आहे .

सुकी नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल बांधल्याने उटखेडा ते चिनावल ही गावे जोडली गेली आहेत. त्यामुळे या परिसरातील जनतेचे दळणवळणाचे अंतर कमी झाले आहे. नोकरी, शिक्षण आणि व्यवसायासाठी सावदा येथे जाणाऱ्या प्रवाशांची वर्दळ सुकी नदीच्या पुलावरून वाढली आहे. त्याचप्रमाणे या परिसरात केळीने भरलेली अवजड वाहनेही याच पुलावरून ये-जा करतात. मात्र, सध्या या पुलावर अनेक मोठमोठे खड्डे पडले आहेत. या पुलाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेली लोखंडी आसारीदेखील उघडी पडली असून, वर आली आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. या खड्ड्यांना चुकवीत प्रवास करताना वाहनचालकांना तोरवरची कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कानाडोळा करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हे खड्डे बुजवावेत, अशी अपेक्षा या मार्गावरून जाणारे वाहनधारक करीत आहेत.

Web Title: The bridge over the dry river is fatal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.