वाघूर नदीवरील पूल बनतोय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 11:39 PM2019-10-20T23:39:24+5:302019-10-20T23:39:36+5:30

सरंक्षण कठडे मोडकळीस : वाहनधारक, प्रवाशांची सुरक्षा धोक्यात, अपघातास निमंत्रण

Bridge over river Waghur is becoming dangerous | वाघूर नदीवरील पूल बनतोय धोकादायक

वाघूर नदीवरील पूल बनतोय धोकादायक

Next



पहूर, ता.जामनेर : येथे जळगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वाघूर नदीवरील पुलाला जागोजागी मोठमोठे भगदाड पडलेले आहेत. त्यात पुलाच्या दोन्ही बाजूचे सरंक्षण कठडेही जीर्ण झाल्याने वाहनधारकांबरोबरच प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. वेळीच याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
जळगाव-औरंगाबाद या महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होऊन राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत या रस्त्याचे काम सुरू आहे. पहूर येथील वाघूर नदीवरील पूल हा मध्यप्रदेश, हैदराबाद, गुजरात व महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, जळगाव या शहरांना जाणाऱ्या मार्गांना जोडणारा असून जिल्ह्यातील वाहतुकीचा केंद्रबिंदू आहे. काही वर्षांपासून पुलाच्या दोन्ही बाजूंचे सरंक्षण कठडे जीर्ण होऊन कोलमडत आहेत. तसेच पुलावर जागोजागी भगदाड पडत असल्याने वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक ठरत असल्याने प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या पुलाच्या नुतनीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे गेल्या वर्षी सांगण्यात आले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी पाठपुरावा सुरु ठेवला आहे.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या शाखा अभियंत्यांना विचारणा केली असता, जळगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग हा जालना विभागाच्या राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. वाघूर नदीवरील पूलाचे नुतनीकरण संबंधित कंत्राटदारामार्फत होणार आहे. या कामाशी आमचा संबंध नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

वेळीच दखल घ्यावी
वाहने पुलावरुन जाताना कंपण होत असून पादचा?्यांना चालणे धोकादायक होेत आहे. प्रशासनाने वेळीच देखभाल व दुरूस्तीचा प्रश्न गांभीर्याने घ्यायला हवा. अन्यथा एखाद्या दुर्दैवी घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

Web Title: Bridge over river Waghur is becoming dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.