जळगाव घरकूल प्रकरणाशी संबंधित संक्षिप्त माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 03:57 PM2019-08-31T15:57:57+5:302019-08-31T15:58:35+5:30

* गुन्हा दाखल - २७ जानेवारी २००६ * १७ डिसेंबर २०१४ रोजी हा खटला जळगावच्या न्यायालयातुन धुळे येथील विशेष ...

Brief information related to Jalgaon Gharkool case | जळगाव घरकूल प्रकरणाशी संबंधित संक्षिप्त माहिती

जळगाव घरकूल प्रकरणाशी संबंधित संक्षिप्त माहिती

googlenewsNext

* गुन्हा दाखल
- २७ जानेवारी २००६
* १७ डिसेंबर २०१४ रोजी हा खटला जळगावच्या न्यायालयातुन धुळे येथील विशेष न्यायालयात वर्ग करण्यात आला.
* सुरेशदादा भिकमचंद जैन यांच्याकडून अ‍ॅड़ राजा ठाकरे आणि अ‍ॅड़ जितेंद्र निळे यांनी बाजू मांडली़
* मुळ फिर्यादी आणि आरोप
- जळगाव महापालिकेचे तत्कालिन आयुक्त डॉ़ प्रविण गेडाम हे मुळ फिर्यादी आहेत़ २९ कोटींचा अपहार असून मक्तेदारास झुकते माप आणि अनियमितता असे आरोप लावण्यात आले आहे़
* गुन्हा दाखल झाल्यापासून दोषारोपपत्र दाखल होईपर्यंतचा काळ
- प्रथम दोषारोप २५ एप्रिल २०१२
पुरवणी दोषारोप १ जून २०१२
* ५ न्यायाधीशांपुढे कामकाज सुरु होते
- न्यायाधीश व्ही.एस.दीक्षित (जळगाव)
न्यायाधीश एन.आर.क्षीरसागर (जळगाव)
न्यायाधीश आऱ आऱ कदम (धुळे)
न्यायाधीश एस़एस़ शिंदे (धुळे)
न्यायाधीश डॉ़ सृष्टी नीळकंठ (धुळे)
* खटल्याचे कामकाज सुरु असताना टप्प्या टप्प्याने सर्वांना जामीन मंजूर झाला
* सरकारी वकील
- अ‍ॅड़निर्मलकुमार सूर्यवंशी (खटला सुरु असताना निधन झाले )
अ‍ॅड़ प्रविण चव्हाण
------------------
* खटला सुरु असताना कोणत्या आरोपीचे निधन
- संशयित आरोपी भागिरथी बुधा सोनवणे आणि शालिग्राम मुरलीधर सोनवणे यांचा समावेश आहे़
* खटल्यात किती साक्षी आणि पुरावे तपासण्यात आले़
- या खटल्यात एकूण ४८ जणांची साक्ष आणि शेकडो कागदपत्रे तपासण्यात आली आहेत़
* या घरकुल प्रकरणात माजी नगरसेवक विजय वाणी यांनी तपासाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक ईशु सिंधू व फिर्यादी डॉ.प्रवीण गेडाम यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अवमान याचिका दाखल केली होती.

Web Title: Brief information related to Jalgaon Gharkool case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.