नामदेव महाराज रवंजेकर यांच्या पायी दिंडी मुक्कामाच्या आठवणींना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:12 AM2021-07-10T04:12:24+5:302021-07-10T04:12:24+5:30
चाळीसगाव शहरातील सुवर्णकार मंगल कार्यालयात गेल्या ४६ वर्षांपासून सुरू असलेल्या पंढरपूर पायी वारीच्या मुक्कामाची आठवण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ...
चाळीसगाव शहरातील सुवर्णकार मंगल कार्यालयात गेल्या ४६ वर्षांपासून सुरू असलेल्या पंढरपूर पायी वारीच्या मुक्कामाची आठवण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी प्रवचन व प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी खासदार उन्मेश पाटील बोलत होते. यावेळी श्रीक्षेत्र सुकेश्वर संस्थानचे अध्यक्ष सदगुरू नामदेव महाराज प्रतिष्ठान अध्यक्ष प्राचार्य विजय भामरे रवंजेकर, भागवताचार्य हभप समाधान महाराज, रामायणाचार्य लीलाधर महाराज श्रीक्षेत्र म्हसावदचे हभप चंद्रकांत महाराज, श्रीक्षेत्र मेहुण हभप जितेश महाराज यांचा सत्कार खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उद्योजक नीलेश सराफ, सोमनाथ सराफ, प्रभाकर बाविस्कर, पद्माकर विसपुते, नगरसेवक गणेश महाले, अजिंक्य बाविस्कर, सामाजिक कार्यकर्ते बंडू पगार, बाबुराव बाविस्कर, साधना अहिरराव, प्रभावती अहिरराव,पद्मजा बाविस्कर, रा.मो. सोनार यांच्यासह भाविक उपस्थित होते.
खासदार पाटील यांच्या हस्ते सुरुवातीला विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमांचे पूजन करून ग्रंथपूजन करण्यात आले. सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ.प्रकाश बाविस्कर यांनी तर आभार राम कुलथे यांनी व्यक्त केले. दिंडीचे यजमान श्यामराव अहिरराव यांचाही खासदार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाविकांनी प्रवचनाचा, तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला.