पूज्य साने गुरुजींच्या आठवणींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:14 AM2020-12-25T04:14:12+5:302020-12-25T04:14:12+5:30

जळगाव : ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना सामूहिकरीत्या म्हणून गुरुवारी (दि.२४) पूज्य साने गुरुजी यांना शाळांमध्ये अभिवादन करण्यात ...

Brighten the memories of Pujya Sane Guruji | पूज्य साने गुरुजींच्या आठवणींना उजाळा

पूज्य साने गुरुजींच्या आठवणींना उजाळा

Next

जळगाव : ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना सामूहिकरीत्या म्हणून गुरुवारी (दि.२४) पूज्य साने गुरुजी यांना शाळांमध्ये अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कविता कथाकथन, निबंध, वकृत्व स्पर्धांनी रंग भरल होते, तर मुख्याध्यापक व शिक्षकांनी साने गुरुजींच्या जीवन कार्याची विद्यार्थ्यांना माहिती देऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

राज प्राथमिक-माध्यमिक विद्यालय

मेहरूण परिसरातील राज प्राथमिक-माध्यमिक विद्यालय व डॉ. सुनील महाजन ज्युनिअर कॉलेज येथे साने गुरुजी यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम उपशिक्षिका जयश्री महाजन यांच्याहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक सी. व्ही. पाटील यांनी साने गुरुजींच्या जीवनावर आधारित माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. सूत्रसंचालन सुशील सुरवाडे यांनी केले, तर आभार डी. वाय. ब-हाटे यांनी मानले.

--------------

कमल राजाराम वाणी विद्यामंदिर (फोटो)

प्रगती शिक्षण मंडळ संचलित कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिरात पूज्य साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम पार पडला. शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र माळी व नीलेश नाईक यांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये वकृत्व, कथाकथन, निबंध, प्रार्थना व कविता गीतगायन आदी उपक्रम घेण्यात आले. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी पूज्य साने गुरुजींच्या पुस्तकांचे वाचन केले. कार्यक्रमात उज्ज्वला जाधव, रशिदा तडवी, राहुल धनगर, संगीता निकम, सुवर्णा सोनार आदींची उपस्थिती होती.

---------------

सुगदेवकर प्रायमरी स्कूल

सुगदेवकर प्रायमरी स्कूलमध्ये मुख्याध्यापक साधना महाजन यांच्याहस्ते पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपशिक्षक यागेश वंजारी यांनी साने गुरुजींच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची माहिती दिली. ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना सामुदायिकरीत्या म्हणून साने गुरुजी यांना अभिवान करण्यात आले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

---------------

मानवसेवा विद्यालय

मानवसेवा विद्यालयात ऑनलाइन पूज्य साने गुरुजींची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक प्रतिभा सूर्यवंशी, माया अंबटकर, मुक्ता पाटील यांची उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

---------------

खुबचंद सागरमल विद्यालय (फोटो)

खुबचंद सागरमल विद्यालयात साने गुरुजी यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक सतीश साळुंखे यांनी पुष्पहार अर्पण केले. याप्रसंगी सुरेश आदिवाल, भास्कर कोळी, अजय पाटील, प्रवीण पाटील, मयूर पाटील, सुलेमान तडवी आदी उपस्थित होते.

-----------------

शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय (फोटो)

के.सी.ई. सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एकाकडून साने गुरुजी यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अशोक राणे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. संदीपकुमार केदार व उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणातून डॉ. राणे यांनी साने गुरुजी यांच्या अतुलनीय कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. याप्रसंगी प्रा. नीलेश जोशी, प्रा.प्रवीण कोल्हे, डॉ.गणेश पाटील, मोहन चौधरी, संजय जुमनाके, विजय चव्हाण, विनोद पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते.

-------------------

कृष्णगिरी, कनिष्का, दिशाची बाजी

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी जयंतीनिमित्त ‘श्यामची आई’ या विषयावर ऑनलाइन प्रश्नमंजूषा घेण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक डी. व्ही. चौधरी यांनी साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रतिभा लोहार, वर्षा राणे, सी. बी. कोळी यांनी केले. त्यानंतर इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘श्यामची आई’ या पुस्तकातील दहा रात्रींचे कथाकथन ऐकविण्यात आले. त्यानंतर ३० गुणांची ऑनलाइन प्रश्नमंजूषा घेण्यात आली. इयत्ता आठवीच्या गटातून प्रथम क्रमांक कृष्णगिरी गोसावी याने पटकाविला, द्वितीय सुजल चौधरी, तृतीय पद्मिनी जाधव व चैतन्य खाचणे ठरला. नववीच्या गटातून प्रथम कनिष्का चौधरी, द्वितीय तुषार घोडके, तृतीय प्रिंयका भारुडे तसेच दहावी गटातून प्रथमक दिशा चौधरी, द्वितीय हर्षल पाटील, तृतीय कृतिका साळी ठरली.

-----------------------

जय दुर्गा माध्यमिक विद्यालय

जय दुर्गा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात मुध्याध्यापक सागर कोल्हे यांच्याहस्ते प्रतिमापूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर ज्योती पाटील यांनी पूज्य साने गुरुजी यांच्या जीवनावर आधारित माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

--------------------

महात्मा गांधी विद्यालय

भादली बुद्रूक येथील महात्मा गांधी विद्यालयात साने गुरुजी यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यालयातील साने गुरुजी बालकथ येथे साने गुरुजींच्या अर्धकृती पुतळ्याचे पूजन संस्थेचे ज्येष्ठ संचालक सुधाकर नारखेडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक आर. के. तायडे, डी. के. धनगर, के. डी. रडे आदी उपस्थित होते.

------------------------

आर. आर. विद्यालय

आर. आर. विद्यालयात येथे प्रभारी मुख्याध्यापक विजय रोकडे यांच्या हस्ते पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी ‘श्यामची आई’ ही साहित्य कृती समाजाला लाभलेली संस्काराची शिदोरी असल्याचे सांगितले. याप्रसंगी पी. आर. श्रावगी, डी. डी. जोशी, जे. एम. पाटील, पी. बी. बावस्कर, वाय. एच. बडगुजर, एस. आर. वाणी, सी. एन. पाटील आदींची उपस्थिती होती.

Web Title: Brighten the memories of Pujya Sane Guruji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.