कोरोना रुग्णाच्या मृतदेहासाठी प्लास्टिक व पांढरे कापड आणा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 11:33 PM2021-03-31T23:33:41+5:302021-03-31T23:34:10+5:30
कोरोना रुग्ण दगावल्यानंतर नातेवाईकांना प्रेताला गुंडाळण्यासाठी प्लास्टिक व पांढरा कागद आणण्याची सूचना ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
एरंडोल : ग्रामीण रुग्णालयात असलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये एरंडोल येथील अरुण भिका महाजन ( ५५) या कोरोना रुग्णाचे उपचारादरम्यान रविवारी पहाटे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना प्रेताला गुंडाळण्यासाठी प्लास्टिक व पांढरा कागद आणण्याची सूचना ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांनी केली. एवढेच नव्हे तर नातेवाईकांनाच प्लास्टिक व कापड गुंडाळण्याची सूचनासुद्धा करण्यात आली. या धक्कादायक प्रकारामुळे मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.
यासंबंधीचा व्हीडीओ समाज माध्यमातही व्हायरल झाला आहे. एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये अरुण महाजन यांना शनिवारी चार वाजेच्या सुमारास दाखल करण्यात आले. त्यांचे पहाटे कोरोना शमुळे निधन झाले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना बोलविण्यात आले. मृतदेहाला गुंडाळण्यासाठी प्लास्टिक पेपर व पांढरा कापड आणण्याचे सांगण्यात आले. यावेळी उमेश महाजन, अमोल महाजन, राजेश महाजन, या नातेवाईकांनी प्लास्टिक पेपर व पांढरा कापड आल्यावर प्रेताला गुंडाळण्याची पुन्हा सूचना करण्यात आली त्यामुळे र नातेवाईकांनी प्रेताला प्लास्टिक पेपर व पांढरा कापड गुंडाळला. कोविड केअर सेंटरच्या बाहेर ठीक ठिकाणी वापरलेले हॅन्ड ग्लोज , पीपीइ किटस, कोरोना रुग्णांना वापरलेली औषधे व अन्य साहित्य उघड्यावर पडलेले नातेवाईकांना दिसले. त्यामुळे एकच संताप व्यक्त करण्यात आला.
यावेळी कोणीही जबाबदार डॉक्टर्स कोविड केअर सेंटर मध्ये हजर नव्हते. अशी तक्रार महात्मा फुले युवा मंच चे प्रदेशाध्यक्ष उमेश महाजन यांनी केली. दरम्यान रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक असा हा प्रकार असल्याचा आरोप उमेश महाजन यांनी केला आहे.
अरुण महाजन यांच्या नातेवाईकांनी दिलेला व्हिडिओ एकतर्फी असून त्यात एरंडोल ग्रामीण रुग्णालयाचा वार्ड बॉयसह कोणीही कर्मचारी कुठेही दिसत नाही. रुग्णालयात दोन डॉक्टर्स असून येथील कोविड सेंटरमध्ये ४० कोरोना रुग्ण दाखल आहेत व ऑक्सिजन वाडॉमध्ये २४ रुग्ण उपचार घेत आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील यांच्याशी या नातेवाईकांशी बाचाबाची झाल्यामुळे त्यांनी खोटी तक्रार केलेली आहे.
-विनय गोसावी, प्रांताधिकारी, एरंडोल.