बीआरएम ६०० किमी. सायकल स्पर्धेत डाॅ. अनघा चोपडे यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:18 AM2021-09-21T04:18:06+5:302021-09-21T04:18:06+5:30

जळगाव : नांदेड येथे नुकत्याच झालेल्या बीआरएम ६०० किमी इंटरनॅशनल इव्हेंटमध्ये जळगाव येथील महिला सायकलपटू डाॅ. अनघा सुयोग चोपडे ...

BRM 600 km In the cycle competition, Dr. Success of Anagha Chopde | बीआरएम ६०० किमी. सायकल स्पर्धेत डाॅ. अनघा चोपडे यांचे यश

बीआरएम ६०० किमी. सायकल स्पर्धेत डाॅ. अनघा चोपडे यांचे यश

Next

जळगाव : नांदेड येथे नुकत्याच झालेल्या बीआरएम ६०० किमी इंटरनॅशनल इव्हेंटमध्ये जळगाव येथील महिला सायकलपटू डाॅ. अनघा सुयोग चोपडे यांनी यश संपादन केले.

औडाक्स इंडिया परिशियाई यांच्यामार्फत हा इव्हेंट घेण्यात आला. या इव्हेंटमध्ये ६०० किमी सायकलिंगसाठी ४० तासांचा कालावधी देण्यात आला होता. डॉ. चोपडे यांनी २७ तास ४६ मिनिट ९ सेकंदात हा प्रवास पूर्ण केला. नांदेड येथील वाझिराबाद येथून सकाळी ६.४० वाजता या इव्हेंटची सुरुवात झाली. हैदराबादच्या दिशेने सायकलिंगचा प्रवास सुरू झाला, तर मेडचल येथून परतीचा प्रवास करीत हा इव्हेंट पूर्ण केला. आहारासाठी त्यांना डाॅ.सुयोग चोपडे यांनी मार्गदर्शन केले.

सुरभि महिला मंडळाची २५ रोजी सभा

जळगाव : सुरभि बहुउद्देशीय महिला मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. २५) दुपारी ४ वाजता नवसाच्या गणपती मंदिर हॉलमध्ये घेण्यात येणार आहे. वार्षिक सभेनंतर श्री परशुराम जन्मोत्सव सजावट व आरती स्पर्धेतील विजेते तसेच गुरुपौर्णिमेनिमित्त लेख लिहून पाठविणाऱ्या सदस्यांचा सन्मान करण्यात येईल. सभेला उपस्थितीचे आवाहन अध्यक्षा स्वाती कुळकर्णी यांनी केले आहे.

अ.भा. लेवा पाटीदार युवक संघाची सभा

जळगाव : अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाची सभा नुकतीच झाली. यावेळी शाखा लावणे व समाजकार्याची पद्धत या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात अक्षय दिलीप बेंडाळे, ऋषिकेश कोलते, आकाश डिंगबर पाटील, रोशन अरुण इंगळे, सागर उद्धव पाटील, मयूर अनिल इंगळे, विशाल विनोद पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन ऋषिकेश कोलते यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमोल कोल्हे यांनी केले.

भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश सभेची बैठक

जळगाव : भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश सभेच्या जळगाव कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यात जिल्हाध्यक्ष वैद्य गणेश घोपे, कार्याध्यक्ष हिमंतराव पाटील, मुख्य सचिव विनोद बेरभैया, संपर्कप्रमुख अतुल महाजन, सल्लागार ॲड. प्रवीण पाटील, महानगर अध्यक्ष दिलीप साळुंखे उपस्थित होते. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक लाख रुपयाची मदत शासनाने करावी, अशी मागणी करण्यात आली.

राष्ट्रीय पोषण आहार महिन्यानिमित्त वावडद्यात कार्यक्रम

फोटो आहे

जळगाव : तालुक्यातील वावडदा बीटतर्फे पोषण आहार कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत, बांधकाम सभापती ज्योती पाटील, पचायत समिती सभापती ललिता पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. सागर चव्हाण, बालविकास प्रकल्प अधिकारी सुधा गिंधेवार, सरपंच राजेश वाडेकर, पर्यवेक्षिका अर्चना घामोरे यांची उपस्थिती होती. यावेळी वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा, पोषण आहार स्पर्धा घेण्यात आली.

Web Title: BRM 600 km In the cycle competition, Dr. Success of Anagha Chopde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.