धानोरा येथे किराणा दुकान फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 05:32 PM2020-09-06T17:32:37+5:302020-09-06T17:32:43+5:30
दोन लाख रुपये लंपास : अन्य एकाची मोटरसायकलही लांबवली
धानोरा, ता. चोपडा : येथे महामागार्ला लागुन असलेल्या किराणा दुकानात पावने दोन लाख रुपयांची धाडसी चोरी झाली. तसेच बºहाणपुर-अंकलेश्वर राज्य महामार्गावर राहत असलेल्या घरासमोरुन एक मोटारसायकलची पळविली. तर अन्य दोन गाड्यांचेही नुकसान झाले आहे. यामुळे परीसरात भितीचे वातावरण आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील बिडगाव रोडवरील भागवत सोगालाल चौधरी यांच्या श्री गजानन प्रोव्हिजन या किराणा दुकानामध्ये ५ च्या रात्री ते ६ ची सकाळ यादरम्यान तब्बल पावने दोन लाख रोख रुपयांची चोरी झाली.दुकानाची काही प्रमाणात नासधुसही केली. चोरट्याांनी दुकानाला लावलेल्या एकाच कुलूपाचा फायदा घेत टॅमीने अलगत शटर वाकवून कुलूप तोडून आत प्रवेश केला. ६ रोजी सकाळी सहा वाजेला चौधरी यांची पत्नी सुशिलाबाई ह्या दुकान उघडायला गेल्या असता सदर घटना लक्षात आली.यावेळी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.
चौधरी परीवाराने भविष्याच्या दृष्टीने बचत म्हणुन दररोज ५०० ते एक हजार रुपये गेल्या वर्षभरापासुन एका पत्री डब्यात ( गल्ल्यात ) जमा केले होते. यामुळे कष्टाने केलेली बचतही चोरीस गेल्याने कूटूंबाला मानसिक धक्का बसला आहे. याबाबत अडावद पोलिस ठाण्यात संदिप भागवत चौधरी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तिविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनास्थळी अडावद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे,उपनिरीक्षक यादव भदाणे, बीट हवालदार जगदिश कोळंबे आदींनी पाहणी केली. दुसरीकडे याच महामार्गावर वास्तवास असलेल्या अशोक काशिनाथ सोनवणे यांच्या घरासमोर लावलेली एम एच १९ /टी ११९८ ही दुचाकी चोरीस गेली. या चोऱ्यांचा तपास सपोनि योगेश तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जगदिश कोळंबे करीत आहे.
परीसरात चोरट्यांचा धुमाकूळ
गेल्या महिन्यांपासुन परीसरात चो-या वाढलेल्या आहेत. यात शेतीशिवारातील साहित्य, केबल, स्टार्टर, बैलजोडी गुरे तसेच गावातील किरकोळ चोऱ्यांचा समावेश आहे. यामुळे पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी अशी मागणी होत आहे .
श्वान पथक, ठसेतज्ञ घटनास्थळी
चोरीच्या ठिकाणी जळगाव येथील चॅम्प नामक श्वान पथक घटनास्थळी सकाळीच दाखल झाले.श्वान हा जागेवरच घुटमळला.पुढील मार्ग दाखविला नाही. दुकानातील बरण्यांवरील ठसे शोधण्यात आले.यावेळी उपनिरीक्षक सचिन डोंगरे, संदिप परदेशी, मनोज पाटील, ठसेतज्ञ साहेबराव चौधरी, दर्शन बोरसे यांची उपस्थिती होती.