वाहन चालविताना नियम मोडला; दंड कधी भरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:20 AM2021-07-07T04:20:52+5:302021-07-07T04:20:52+5:30

जळगाव : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यापर्यंत ठीक, पण कारवाई केल्यानंतर दंडही न भरणा-यांचीही कमी नाही. पाच महिन्यात शहरातील ...

Broke the rules while driving; When will the fine be paid? | वाहन चालविताना नियम मोडला; दंड कधी भरणार?

वाहन चालविताना नियम मोडला; दंड कधी भरणार?

Next

जळगाव : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यापर्यंत ठीक, पण कारवाई केल्यानंतर दंडही न भरणा-यांचीही कमी नाही. पाच महिन्यात शहरातील २३ हजार १६३ वाहनधारकांनी तब्बल १ कोटी ९ लाख ४९ हजार ८०० रुपयांचा दंड थकविला असून, आता या वाहनधारकांवर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

शहरातील वाहनधारकांना शिस्त लागावी आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी पोलीस दलातील वाहतूक शाखेच्या वतीने दिवसभर रस्त्यावर थांबून प्रयत्न केले जातात. यात वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हा महत्त्वाचा मुद्दा असतो. शिवाय वाहतूक व्यवस्था सुरळीत राहून वाहनधारकांना त्रास होऊ नये, यासाठीही प्रयत्न केले जातात. वाहनधारकांना शिस्त लागावी याच उद्देशाने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. जळगाव शहरातील वाहतूक व्यवस्था तर पार कोलमडून गेली आहे. नो पार्किंगमध्ये वाहन लावणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे, विरुद्ध मार्गाने वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे यासह कर्णकर्कश आवाज करीत वाहन दामटण्याचे प्रकार शहरात नित्याचे झाले आहेत. याविरुद्ध वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी जानेवारी ते मे महिन्यात कारवाई केली.

पाच महिन्यातील कारवाई

१ जानेवारी २०२१ ते ३१ मे २०२१ या काळात २९ हजार ८५७ केसेस करून या वाहनधारकांकडून १ कोटी २५ लाख १ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मात्र त्यापैकी १ कोटी ९ लाख ४९ हजार ८०० रुपयांचा दंड अद्यापही वसूल झाला नाही. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याबरोबरच या वाहनधारकांनी दंड भरण्यातही कुचराई केली आहे. दरम्यान, यातील काही जणांनी ऑनलाइन दंड भरल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तर वाहनाचा परवाना होऊ शकतो रद्द

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर वाहतूक शाखेकडून वाहनधारकांना दंड केला जातो. दंडाची रक्कम वाहनधारकाकडून वसूल केली जाते. मात्र एकाच वाहनधारकाने तीन वेळा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले तर त्या वाहनधारकाचा वाहन परवाना रद्द करण्याचे अधिकार पोलिसांकडे आहेत. शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत वाहन चालवण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वाहनधारकांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

०००००००००००

हेल्मेट वापर न करणाऱ्यांवर सर्वाधिक कारवाई

शहर वाहतूक शाखेच्यावतीने हेल्मेट न वापरणाऱ्यांना तब्बल ११ हजार ८८६ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. या वाहनधारकांना ५९ लाख ४३ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. त्यानंतर लायसन्स जवळ न बाळगणाऱ्या ३ हजार ४४४ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या ३ हजार ३४२ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे.

०००००००००००

जानेवारी ते मेपर्यंत किती जणांनी मोडला नियम : २९ हजार ८५७

एकूण दंडाची रक्कम : १ कोटी २५ लाख १ हजार २००

किती व्यक्तींनी भरला दंड : ६ हजार ६९४

भरलेला दंड : १५ लाख ५१ हजार ४००

किती व्यक्तींनी दंड भरलाच नाही : २३ हजार १६३

थकबाकी दंडाची रक्कम : १ कोटी ९ लाख ४९ हजार ८००

०००००००००००

अशी आहे कारवाई

कारवाईचा प्रकार एकूण कारवाई एकूण दंड थकबाकी रक्कम

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे ९९८ १९९६०० ९७६००

भरधाव वाहन चालविणे ३३४२ ३३४२००० ३१९८०००

हेल्मेटचा वापर न करणे ११८८६ ५८४३००० ५८९३०००

सिटबेल्टचा वापर न करणे २७८८ ५५७६०० २३३०००

ट्रिपलशिट ९७० १९५८०० १३६२००

नो-पार्किंगमध्ये वाहने लावण १८८३ ३७६६०० ३२५२००

फॅन्सी नंबर प्लेट ४७२ १३७६०० ९३०००

विना लायसन्स ३४४४ ६८८८०० २८०४००

म्युझिकल हॉर्न २३ ११५०० ६५००

नो-एंट्री २०९ ४१८०० २०४००

Web Title: Broke the rules while driving; When will the fine be paid?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.