भाऊंना भावांजली- जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:42 AM2020-12-11T04:42:41+5:302020-12-11T04:42:41+5:30
संकल्पना विनोद पाटील यांची, तर दिग्दर्शक नारायण बाविस्कर आहेत. सोमवारी १४ डिसेंबर रोजी चर्चासत्र होइल. कोरोनानंतर निर्माण झालेल्या ...
संकल्पना विनोद पाटील यांची, तर दिग्दर्शक नारायण बाविस्कर आहेत. सोमवारी १४ डिसेंबर रोजी चर्चासत्र होइल. कोरोनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने ‘Economic Crisis आणि सांस्कृतिक जग या विषयावर चर्चा होणार आहे. यात सुशील अत्रे, एस. एस. राणे, अस्मिता गुरव , डॉ. अनिल डोंगरे, यजुर्वेंन्द्र महाजन, मंजूषा भिडे हे वक्ते सहभागी होणार आहेत. हे चर्चासत्र रोटरी भवन, मायादेवीनगर येथे दुपारी ४.३० होईल. मंगळवा दि. १५ रोजी भाऊंच्या उद्यानात महाश्वेता देवी यांच्या मूळ कादंबरीवर आधारित ‘कुरुक्षेत्रानंतर‘ हे नाटक सादर होईल. याचे नाट्यरूपांतर व दिग्दर्शन शंभू पाटील यांचे, तर संकल्पना मंजूषा भिडे यांची आहे. महोत्सवाचा समारोप बुधवारी दि.१६ रोजी दि. बा. मोकाशी यांच् ‘पालखी’ या कांदबरीच्या सादरीकरणाने होणार आहे. भावांजली महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. पाच दिवसीय महोत्सवात सोमवार वगळता सर्व कार्यक्रम भाऊंच्या उद्यानातील एम्फी थिएटरमध्ये सादर होतील. सर्व कार्यक्रम सायंकाळी ६.३० वा सुरू होणार आहेत. रसिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महोत्सवाचे प्रमुख अनिस शहा, अनिल कांकरिया, अमर कुकरेजा यांनी केले आहे.