‘मैत्रय’च्या वर्षा सत्पाळकर यांच्या भावाला जळगाव पोलिसांकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:10 PM2018-02-10T23:10:09+5:302018-02-10T23:10:59+5:30

 जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या फसवणूक व अपहाराच्या गुन्ह्यात ‘मैत्रय’च्या चेअरमन वर्षा मधुसूदन सत्पाळकर यांचे भाऊ तथा संचालक जनार्दन अरविंद परुळकेर (रा.वसई, जि.पालघर) याला जिल्हा पेठ पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याला परभणी येथील कारागृहातून ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने परुळेकर याला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

The brother of 'Maitreya' Varsha Satpalkar's brother was arrested from Jalgaon Police |  ‘मैत्रय’च्या वर्षा सत्पाळकर यांच्या भावाला जळगाव पोलिसांकडून अटक

 ‘मैत्रय’च्या वर्षा सत्पाळकर यांच्या भावाला जळगाव पोलिसांकडून अटक

Next
ठळक मुद्देचार दिवस पोलीस कोठडी नोव्हेंबर २०१६ मध्ये दाखल होता गुन्हापरभणी येथून घेतले ताब्यात

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१०  :  जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या फसवणूक व अपहाराच्या गुन्ह्यात ‘मैत्रय’च्या चेअरमन वर्षा मधुसूदन सत्पाळकर यांचे भाऊ तथा संचालक जनार्दन अरविंद परुळकेर (रा.वसई, जि.पालघर) याला जिल्हा पेठ पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याला परभणी येथील कारागृहातून ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने परुळेकर याला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गजानन साहेबराव पाटील (वय ४१, रा.राधाकृष्ण नगर, जळगाव) यांनी मैत्रय प्लॉटर्स व स्ट्रक्चर्स, शाखा जळगाव यांच्याकडे १० जानेवारी २०१२ ते १७ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत दर सहामाही २ हजार८० रुपये भरुन पॉलिसी काढली होती. त्यासाठी १२ टक्के व्याजदर देण्याचे कंपनीने जाहीर केले होते. या कालावधीत २१ हजार ६०० रुपये भरले. मुदत संपल्यानंतर पैसे मिळणे अपेक्षित असतानाही ते मिळाले नाहीत. म्हणून पाटील यांनी १७ नोव्हेंबर २०१६ रोजी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला चेअरमन वर्षा मधुसूदन सत्पाळकर व त्यांचा भाऊ तथा संचालक जनार्दन अरविंद परुळेकर (दोन्ही. रा.वसई, जि.पालघर) या दोघांविरुध्द अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Web Title: The brother of 'Maitreya' Varsha Satpalkar's brother was arrested from Jalgaon Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.