जळगाव जिल्हावासीयांना भावला पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदींचा साधेपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 11:53 AM2018-12-06T11:53:13+5:302018-12-06T11:59:18+5:30

‘जय महाराष्ट्र, जय गुजरात’च्या घोषणेने मिळविल्या टाळ््या

Brother Of PM Pralhad Modi's simpelicity | जळगाव जिल्हावासीयांना भावला पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदींचा साधेपणा

जळगाव जिल्हावासीयांना भावला पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदींचा साधेपणा

Next
ठळक मुद्देमोर्चात पायी सहभाग नागरिकांची भेट घेत स्वीकारला सत्कारअखेरपर्यंत पोलीस सुरक्षा

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी हे जळगावात आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी व त्यांचा सत्कार करण्यासाठी आलेल्या प्रत्येकाची भेट घेत व सत्कार स्वीकारत प्रल्हाद मोदी यांनी जळगावकरांना साद घालत त्यांची मने जिंकली. मोदी यांचा हाच साधेपणा जिल्हावासीयांना मोठा भावला. मोर्चा संपल्यानंतरही अखेरपर्यंत पोलीस सुरक्षा असलेल्या प्रल्हाद मोदी यांनी सुरक्षिततेचा विचार न करता अत्यंत साधेपणाने सर्वांना भेटत मोर्चातही पायी सहभाग घेतला. दरम्यान, आपल्या भाषणाच्या शेवटी मोदी यांनी ‘जय महाराष्ट्र , जय गुजरात’ असा उल्लेख करताच टाळ््यांचा कडकडाट झाला.
देशाच्या पंतप्रधानाचा भाऊ शहरात येणार असल्याने याबाबत शहरवासीयांसह जिल्हावासीयांना आकर्षण होते. त्यामुळे त्यांना भेटण्याची अनेकांना ओढ होती. याचाच प्रत्यय शिवतीर्थ मैदानावर स्वस्त धान्य दुकानदारांच्या मेळाव्याप्रसंगी आला. सुरुवातीला स्वागत समारंभा वेळीदेखील मुख्य स्वागत झाल्यानंतर पुन्हा अनेकांनी पुढे येत मोदी यांचे स्वागत केले. इतकेच नव्हे तर भाषण झाल्यानंतर पुन्हा अनेकांनी त्यांचा सत्कार केला. गर्दी होत असली तरी प्रल्हाद मोदी यांनी कोणालाही नकार दिला नाही व प्रत्येकाची भेट घेत सत्कारही स्वीकारला. मोदी यांची हीच साद व पंतप्रधानांचा भाऊ भेटल्याचा आनंद अनेकांना सुखावून गेला.
सुरक्षा रक्षकाची करडी नजर
प्रल्हाद मोदी यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्यासोबत एक पोलीस कर्मचारी होता. तसेच व्यासपीठाच्या बाजूला एक रायफलधारी पोलीसदेखील तैनात होता. या सुरक्षा रक्षकांची सर्वत्र करडी नजर होती. औरंगाबाद येथील खास पोलीस कर्मचारी त्यांच्यासोबत होता. असे असले तरी मोदी यांनी असुरक्षिततेची भावना न ठेवता सर्वांमध्ये मोकळेपणाने वावरले.
भाऊ म्हणून नाही, दुकानदार म्हणून आलो
मी येथे एका पंतप्रधानाचा भाऊ म्हणून नाही तर एक रेशन दुकानदार म्हणून आलो, असे सांगताच उपस्थितांनी त्यांच्या या वक्तव्याचे जोरदार स्वागत केले.
आमच्या मागण्या मार्गी लावा
जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देताना मोदी हे पुढे न जाता पदाधिकाऱ्यांना त्यांनी मान दिला. शेवटी केवळ ‘आमच्या मागण्या मार्गी लावा’ अशी विनंती त्यांनी अधिकाºयांना केली. यातही त्यांनी देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीचा भाऊ असल्याचा आव आणला नाही.
पायी सहभाग
मोर्चा सुरू झाल्यांनतर अखेरपर्यंत प्रल्हाद मोदी हे जिल्हाधिकारी कार्यालयाप़र्यंत पायीच मोर्चात सहभागी होते. वाहनात न बसता पायी येतो, असे त्यांनी अगोदरच सांगितले होते.
बोलण्यास सुरुवात करताच जल्लोष
प्रल्हाद मोदी यांचा आवाज व बोलण्याची पद्धत सारखीच असल्याचा प्रत्यय जळगावकरांना आला. प्रल्हाद मोदी यांनी ‘भाईयो और बहनो...’ असे म्हणत बोलण्यास सुरुवात केली व हा आवाज नरेंद्र मोदींसारखाच असल्याने उपस्थितांनांनी एकच जल्लोष केला.

Web Title: Brother Of PM Pralhad Modi's simpelicity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.