सततच्या भांडणातून भावाने केला लहान भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 11:53 AM2019-10-20T11:53:18+5:302019-10-20T11:54:38+5:30

दारुच्या नशेत व्हायचे सतत वाद

Brother's younger brother murdered by constant quarrel | सततच्या भांडणातून भावाने केला लहान भावाचा खून

सततच्या भांडणातून भावाने केला लहान भावाचा खून

Next

जळगाव : दारुच्या नशेत सतत होणाऱ्या वादातून मोठ्या भावाने नशेत लहान भावाचा डोक्यात लाकडी दांडा टाकून खून केल्याची घटना शनिवारी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पिंप्राळा हुडको भागात घडली. दीपक प्रल्हाद मरसाळे (२५) असे मृताचे नाव असून संशयित जय मरसाळे याला पोलिसांनी अटक केली आहे.
वडील प्रल्हाद तानकू मरसाळे यांच्या फिर्यादीवरुन मुलगा जय याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, प्रल्हाद मरसाळे यांना तीन मुले आहेत. मोठा मुलगा विजय हा जैनाबाद परिसरात आपल्या कुटुंबासह राहतो. तर जय प्रल्हाद मरसाळे (३५) आणि दीपक प्रल्हाद मरसाळे (२५) हे पिंप्राळा हुडको परिसरातील मातंग वाड्यात एकत्र राहतात. त्यांचा घराच्या बाजूला प्रल्हाद मरसाळे भाड्याच्या घरात राहतात. शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास जय आणि दीपक यांनी घरी एकत्र जेवण केले. जय मरसाळे याला दारू पिण्याची सवय आहे.
दरम्यान, दोघा भावांमध्ये किरकोळ वाद सुरू होता. मध्यरात्रीच्या सुमारास जय याचे लहान भाऊ दीपक याच्याशी वाद झाला. त्यात डोक्यात लाकडी दांडा टाकल्याने दीपकचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल बडगुजर व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान संशयित आरोपी जय मरसाळे याला सकाळी ७ वाजेच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले.
फाशी घेतल्याचा बनाव
या घटनेनंतर जय याने सकाळी वडीलांचे घर गाठून भाऊ दीपक याने फाशी घेतली असून तो मृत झाला आहे असे वडीलांना सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या वडीलांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता दीपक याच्या डोक्यातून रक्तस्त्राव आलेला होता तसेच जमिनीवरही रक्त पडलेले होते. कापडाने हे रक्त पुसल्याचे दिसून येत होते. नेहमी दोन्ही भावांमध्ये दारुच्या नशेत वाद होत असल्याने यश यानेच दीपकला मारल्याची फिर्याद वडीलांनी दिली. त्यानुसार रामानंद नगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Brother's younger brother murdered by constant quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव