पाचोऱ्यात बीएसएनएलची सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:21 AM2018-12-25T00:21:01+5:302018-12-25T00:24:55+5:30

पाचोरा : येथे गेल्या आठ दिवसांपासून बीएसएनएलची सेवा ठप्प झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यात शासनाने बहुतेक शासकीय कामे आॅनलाईन केल्यामुळे या त्रासाची तिव्रता वाढली आहे.

 BSNL service suspended in the cybercrime | पाचोऱ्यात बीएसएनएलची सेवा ठप्प

पाचोऱ्यात बीएसएनएलची सेवा ठप्प

Next
ठळक मुद्देजळगाव- चांदवड रस्ता कामामुळे केबल तुटलीबीएसएनएल व ठेकेदारात समन्वय नसल्याची तक्रार

पाचोरा : शासनाने सर्वच कामे आॅनलाईन केली असल्याने इंटरनेटवर अवलंबून राहावे लागत असताना बीएसएनएलची सेवा आठवडाभरापासून कोलमडल्याने पाचोरा तालुक्यातील जनता त्रस्त झाली आहे.
जळगाव- चांदवड या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सद्या सुरू आहे. या बांधकामाचा ठेका घेतलेल्या कंपनीने सदर रस्त्याचे खोदकाम बºयाच ठिकाणी सुरू ठेवले असल्याने त्यात बीएसएनएलची केबल तुटल्याने वारंवार सेवा खंडित होऊन मोठी समस्या निर्माण होत आहे. पाचोरा शहरातील बँक सेवा, शासकीय कार्यालय, खाजगी आस्थापने, छोटे उद्योग याठिकाणी बीएसएनएलची नेट सेवा आहे. नागरिकांना ह्याच ठिकाणी आर्थिक व्यवहार, व्यापार, आॅनलाइन करावा लागतो.मात्र रस्त्यांच्या कामामुळे केबल फॉल्ट होऊन कामकाज ठप्प होत आहे.
परिणामी जनतेचे आर्थिक नुकसान होऊन वेळ व पैशाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

शासकीय कामकाज ठप्प
गेल्या आठवडाभरापासून बीएसएनएल सेवा विस्कळीत झाल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात मिळकतीचे दस्त नोंदणी थांबली आहे. दररोज पक्षकारांना दस्तऐवज नोंदणी साठी दिवसभर नेटसेवा सुरू होण्याची वाट पहावी लागत असल्याने अनेकांचे व्यवहार रद्द झाल्याच्या तक्रारी आहेत.दस्तऐवज घेऊन नंबर लावण्यासाठी पक्षकार व स्टॅम्प वेंडर पहाटे ४ वाजेपासून दुय्यम निबंधक कार्यालय गेटवर हजर असतात .मात्र नेटसेवेचा भरवसा नसल्याने कामे होत नाहीत .७/१२देखील मिळू शकत नसल्याने नागरिक हैराण झाले आहे.
बीएसएनएल व ठेकेदार यांच्यात समन्वय नाही
रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून अनेकदा समस्या उदभवल्या असतानाही समन्वयाअभावी कामकाजात सुधारणा होत नाही. यापुढे समस्या निर्माण झाल्यास नागरिक रस्त्यावर येतील अशी भावना निर्माण झाली आहे. याची बीएसएनएल व संबंधीत कंपनीने दखल घ्यावी व सेवा तात्काळ सुरळीत करावी अशी आम जनतेची मागणी आहे.

 

Web Title:  BSNL service suspended in the cybercrime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.