जड मनाने घेतला बीएसएनएलच्या ४०० जणांनी निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 12:20 PM2020-02-02T12:20:21+5:302020-02-02T12:21:05+5:30

अडीच लाख ग्राहकांची जबाबदारी आता केवळ १५० कर्मचाऱ्यांवर

BSNL's message was taken with a heavy heart | जड मनाने घेतला बीएसएनएलच्या ४०० जणांनी निरोप

जड मनाने घेतला बीएसएनएलच्या ४०० जणांनी निरोप

Next

जळगाव : आर्थिक संकटात सापडलेल्या बीएसएनएलला बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांनी स्वत:हून निवृत्ती पत्करण्यास सुरुवात केली आहे. ३१ जानेवारी रोजी एक दोन नव्हे तर तब्बल ४०० कर्मचाºयांनी एकाच दिवशी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यामध्ये वर्ग १ आणि २च्या २६ अधिकाºयांचा समावेश आहे. यापुढे केवळ १५० कर्मचाºयांना ५५० कर्मचाºयांचं काम करून ग्राहकांना सेवा पुरवावी लागणार आहे.
बीएसएनएल कंपनीला गेल्या काही वर्षांमध्ये घरघर लागली आहे. आर्थिक अडचणीत सापडल्याने बीएसएनएलच्या कर्मचाºयांसमोर केंद्र सरकारने स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय ठेवला. अनेक वर्षे कौटुंबिक वातावरण जपत, त्या कार्यालयात काम केले, ते कार्यालय डबघाईला आले म्हणून सोडून जाणे अनेक कर्मचाºयांना पटणारे नव्हते. मात्र केंद्र शासनाने याबाबत कडक धोरण अवलंबल्याने अनेक कर्मचाºयांनी जड मनाने स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्विकारला.
जळगाव जिल्ह्यात बीएसएनएलचे कर्मचारी व अधिकारी मिळून जवळपास ५५० लोक आहेत. त्यातील जवळपास ४०० लोकांनी ३१ जानेवारीला म्हणजेच शुक्रवारी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
कार्यालय आर्थिक डबघाईस आले असताना, कर्मचाºयांची समर्थपणे सेवा करायची तयारी असतानाही शासनाच्या आडमुठे धोरणामुळे ४०० कर्मचाºयांनी एकाच दिवसात बीएसएनएलची साथ सोडली. यामध्ये वर्ग-१ आणि वर्ग-२च्या २६ कर्मचाºयांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात अविरतपणे लाखो कर्मचाºयांना सेवा देण्याचे अवघड काम आता अवघ्या १५० कर्मचाºयांना करावे लागणार आहे. या १५०पैकी २२ कर्मचारी टप्प्याटप्प्याने मे महिन्यापर्यंत वयोमानानुसार निवृत्त होणार आहेत.

अखेरच्या दिवशीही सायंकाळी उशिरापर्यंत सेवा
होय! नोकरीचा तो अखेरचा दिवस! पण कोठेही सत्कार समारंभ नव्हता वा निवृत्तीचा निरोप समारंभही नव्हता. उलट शहरात महामार्गाच्या कामामुळे आणि अमृत योजनेमुळे विस्कटलेली सेवेची घडी बसवण्यातच कर्मचारी ‘फिल्ड’वर सायंकाळी उशिरापर्यंत गुंग होते.
कुटुंब विस्कटलं, न भरण्यासाठी!
अनेक कार्यालयांमध्ये कर्मचारी निवृत्त होतात, स्वेच्छानिवृत्ती घेतात, त्याठिकाणी नव्याने कर्मचारी नियुक्त केले जातात. पण बीएसएनएलची स्थिती आज वेगळी आहे. हे रिकामं झालेलं कुुटुंब पुन्हा न भरण्याच्या अटीवर रिकामं करण्यात आलं आहे, हे विशेष!
रिकाम्या कार्यालयाचा पहिला दिवस
शुक्रवारी तब्बल ४०० कर्मचारी कमी झाल्याने बीएसएनएलमध्ये शनिवारी शुकशुकाट होता. कॅश काऊंटरलाही कर्मचारी नव्हता. याठिकाणी लवकरच कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येईल. तोपर्यंत ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन बीएसएनएलने केले आहे.
दूरसंचार क्षेत्रात खासगी कंपन्या ताकदीनिशी उतरलेल्या असताना जलद आणि विनम्र सेवेची अपेक्षा करणाºया ग्राहकांना सेवा देताना आता बीएसएनएल कर्मचाºयांच्या नाकीनऊ येणार आहेत.

Web Title: BSNL's message was taken with a heavy heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव