बौद्ध धर्मात स्त्री आणि पुरुषाला समान दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 11:59 AM2019-05-26T11:59:13+5:302019-05-26T11:59:43+5:30
अज्ञान आणि हिंसा बुद्धधम्माच्या विरोधी आहे़
अज्ञान आणि हिंसा बुद्धधम्माच्या विरोधी आहे़ प्रसेनजित राजाची गोष्ट बघा... एकदा राजा बुद्धासोबत धम्मावर चर्चा करीत होते़ एवढ्यात महालातून एक दूत आला़ त्यांनी राजांच्या कानात सांगितलं की प्रमुख राणी मल्लिकाने एका पुत्रीला जन्म दिला आहे़ राजा हे ऐकून दु:खी झाला़ बुद्धांनी विचारले काय झाले? तुझा चेहरा असा का नाराज झाला़? तेव्हा बुद्धांनी पुढील प्रमाणे उपदेश दिला़ बौद्ध म्हणतात काही स्त्रिया खरोखरच पुरूषांपेक्षा योग्य आणि सुंदर असतात़ त्या आपल्या सासुला आदर्श मानतात आणि स्वत:ही पवित्र असतात़ हे राजा अशी स्त्री महाकुलीन पत्नी बनून, एक श्रेष्ठ मुलाला जन्म देईल, जो पुढे जगात एका जगात एका प्रमुख देशाचा राजा बनेल़ राजाला बुद्धवचन ऐकून गहिवरून आलं आणि त्याच्या राणी आणि कन्येचा स्वीकार केला़
हे उच्च स्थानाची बुद्धांची शिकवण आहे़ परंतु आजही मुलींचा जन्म हा आनंदी मानला जात नाही़ जर त्या ठिकाणी मुलगा झाला तर आनंदाला पारावर नसतो़ सर्वोच्च आनंद म्हणजे मुलाचा जन्म अशी आजही भावना आहे़ मनुष्याची उत्पत्ती प्राकृतिक विकासाच्या प्रक्रियेद्वारे झालेली आहे़ या जगात गौतम बुद्धांनी सर्वप्रथम प्राकृतिक नियमांचा उल्लेख केला आहे़ पुरूष असो वा स्त्री जेव्हा मृत्यू येतो तेव्हा त्याला कोणीही वाचवू शकत नाही़
बौद्ध धर्मात स्त्री आणि पुरूषाला समान दर्जा आहे़ बौद्ध कालीन शिक्षणामध्ये स्त्री आणि पुरूष हे दोन्ही सारखे आहेत़ बौद्ध धम्म हा प्राकृतिक विलक्षणतेच्या विश्लेषणावर आधारीत असल्या कारणाने स्त्री आणि पुरूष हे दोन्ही सारखे आहेत़ स्त्री आणि पुरूष यांना भिक्कू म्हणूननच संबोधले जाते़ बौद्ध संस्कृतीतील स्त्रिया खेमा, मगध नरेश बिंबिसार राजाची राणी असो, सम्राट अशोक यांची कन्या संघमित्रा, गणिका असलेली आम्रपाली या सगळ्या स्त्रिया सारख्याच़ स्त्री शिक्षणासाठी अनेक समाज सुधारकांनी प्रयत्न केला़ आजही शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते़ सदगुण, प्रेम, स्रेह ही क्षणिक नाही तर अनंत काळासाठी असावे. स्त्री ही सदाचाराची ठेव आहे़ उदारता हे स्त्रीचे औषधं आहे़
मी कामवासनेच्या दुराचारापासून अलिप्त रहाण्याची शिकवण ग्रहण करतो़ मी परस्त्रीकडे वाईट दृष्टीकोनाने बघणार नाही़ अशी बुद्धांची शिकवण धम्मपदात आहे़
स्वत:च्या शरीरावरती संयम उत्तम आहे़ वाणीचा संयम उत्तम आहे़ सर्व इंद्रियांचा संयम उत्तम आहे़ सर्व प्रकारे संयमित असण्यामुळे भिक्खु सर्व दु:खातून मुक्त होतो़ हे धम्मपदात असलेले वचन सर्व भिक्खु संघाला उपदेशून आहे़ स्त्रियांना वेगळे आणि पुरूषांना वेगळे असे काही नाही़
- सरोजिनी गांजरे- लभाणे, जळगाव