वादळात आमदगावला म्हैस ठार, महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:13 AM2021-05-31T04:13:41+5:302021-05-31T04:13:41+5:30
ऐणगाव येथे घरावरील पत्रे उडाली. निमखेड येथे पपईच्या शेताचे नुकसान झाले. घाणखेड येथे झाडे पडली. वीज खांब पडले, तसेच ...
ऐणगाव येथे घरावरील पत्रे उडाली. निमखेड येथे पपईच्या शेताचे नुकसान झाले. घाणखेड येथे झाडे पडली. वीज खांब पडले, तसेच सोनवणे यांच्या शेतातील केळी बाग पूर्ण खाली पडली. इतर शेतकऱ्यांचे लिंबू, डाळिंब, पपई बागांचे नुकसान झाले आहे.
आमदगाव येथे गजानन पाटणकर व मधुकर गावंडे यांची म्हैस मृत्युमुखी पडली, गावातील मनीषा कोळी या जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला पत्रा लागला. त्यात त्यांना १२ टाके पडले असून, हाताला घरावरील पत्रा लागून दुखापत झाली आहे.
घटनास्थळी आमदार चंद्रकांत पाटील, तहसीलदार घोलप, बीडीओ नागतिलक, वीज वितरण कंपनीचे राठोड, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी भेट दिली. यावेळी पंचायत समिती सभापती गायकवाड, दूध संघ संचालक मधुकर राणे, बाजार समिती उपसभापती सुभाष पाटील, अनिल वराडे, प्रदीप बडगुजर, सरपंच पल्लवी किनगे, प्रल्हाद किनगे, राजेंद्र टोके, नितीन करांडे, विकास करा, गजानन खोडके, दीपक माळी, पवन माळी, आनंद खोडके, गोपाळ सोनवणे, स्वीय सहायक प्रशांत पाटील, दिलीप पाटील, सुनील बोरसे, दीपक पवार, मनोज पाटील, योगेश पाटील, गजानन बोनडेकर व शेतकरी ग्रामस्थ होते. तत्काळ पंचनामे करून शासनाकडून भरीव मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.