वीज वाहक तार तुटल्याने गायीसह बैल मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 12:15 PM2019-10-05T12:15:31+5:302019-10-05T12:17:10+5:30

भरपाई देण्याची मागणी, अभियंत्यांना घेराव

The bull with the cows dies due to the power carrier's wiring | वीज वाहक तार तुटल्याने गायीसह बैल मृत्युमुखी

वीज वाहक तार तुटल्याने गायीसह बैल मृत्युमुखी

Next

ममुराबाद : गावहाळ परिसरात गुरुवारी रात्री वीजपुरवठा सुरु असताना अचानक तार तुटून खाली पडल्याने गायीसह बैलाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, त्यांनी भरपाईची मागणी वीज कंपनीकडे केली
आहे.
गावहाळलगत पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर शांताराम रामदास पाटील हे शेतकरी राहतात. त्यांनी नेहमीप्रमाणे गायीसह बैलजोडी घरासमोर बांधली होती. गुरुवारी रात्री वरून गेलेल्या जीर्ण वीजवाहक तारांपैकी एक तार अचानक तुटुन खाली पडली. काही कळण्याच्या आत विजेचा जोरदार धक्का बसल्याने गाय व एक बैल जागेवरच तडफडून मृत्युमुखी पडले.
हाकेच्या अंतरावर बसलेले राजेंद्र भागवत पाटील व इतर काहीजण थोडक्यात बचावले. दरम्यान, आजुबाजूचे ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. त्यांनी वीजपुरवठा खंडीत करण्यासाठी विदगाव येथील उपकेंद्राला कळविले. अभियंत्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क झाला नाही.
दुसºया दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत घटनास्थळी कोणीच फिरकले नाही.
अभियंत्यांना घेराव १२ तासांपेक्षा जास्तवेळ अंधारात
जीर्ण तार तुटून पडल्यानंतर विदगाव येथून खंडीत करण्यात आलेला ममुराबाद येथील वीजपुरवठा तब्बल १२-१३ तासानंतर दुसºया दिवशी सुरळीत झाला. ग्रामस्थांना अंधार व उकाड्यातच रात्र काढावी लागली. त्याबद्दल सर्वत्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
शुक्रवारी सकाळी महावितरण कंपनीचे अभियंता सपके व भंगाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. याप्रसंगी माजी सरपंच रावसाहेब पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी दोन्ही अभियंत्याना घेराव घातला. पंचनामा करुन शेतकरी शांताराम पाटील यांना तातडीने भरपाई देण्याची व्यवस्था करावी तसेच जीर्ण वीज वाहक तारा बदलण्यात याव्या, अशी मागणी यावेळी सर्वांनी केली.

Web Title: The bull with the cows dies due to the power carrier's wiring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव