सांगवीत झालेल्या शॉर्टसर्किटमुळे बैलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:22 AM2021-08-27T04:22:03+5:302021-08-27T04:22:03+5:30
वाघडू, ता. चाळीसगाव : तालुक्यातील सांगवी येथे सकाळी अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ४५ हजार रुपये किंमतीच्या बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची ...
वाघडू, ता. चाळीसगाव : तालुक्यातील सांगवी येथे सकाळी अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ४५ हजार रुपये किंमतीच्या बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अर्जुन भोमा राठोड (सांगवी, ता.. चाळीसगाव) हा ऊसतोडीची कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. दरम्यान, ऊसतोड मजूर असल्याने त्याच्याजवळ ९५ हजार रुपये किंमतीची बैलांची जोडी आहे. ते नेहमीच घरासमोर बांधलेले असतात. मात्र गुरुवारी सकाळी ६:३० वाजताच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट झाल्याने ४५ हजार रुपये किमतीच्या एका बैलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, अर्जुन भोमा राठोड यांचा संसार पूर्णत: उघड्यावर आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच येथील पोलीस पाटील ज्ञानेश्वर जाधव यांनी घटनेबाबत पोलिसांना कळविले. दरम्यान, हे शॉर्टसर्किट कशामुळे झाले, हे स्पष्ट झालेले नसून पंचनामा करणे सुरू होते.