१० घरांवर चालला बुलडोझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 03:41 PM2020-06-08T15:41:27+5:302020-06-08T15:41:34+5:30

लॉकडाऊनमध्ये झाले बेघर : निंभोरा रेल्वेस्टेशनजवळील कार्यवाही

Bulldozers hit 10 houses | १० घरांवर चालला बुलडोझर

१० घरांवर चालला बुलडोझर

Next


निंभोरा बुद्रुक, ता. रावेर : निंभोरा स्टेशन परिसरात रेल्वे गेट जवळ उड्डान पूल उभारणीचे काम गतीने सुरु झाले असून येथील रहिवाशांचा प्रश्न न सोडवता त्यांच्या घरांचे अतिक्रमण काढून त्यांना बेघर करण्यात आले आहे. १० घरांचे अतिक्रमण काढले गेले असून आणखी चार- पाच घरांचे अतिक्रमण काढणे सुरु आहे. परंतु याकडे लोकप्रतिनिधि व अधिकारी यांचे लक्ष नसल्याने लॉकडाउन मध्येही कोरोना सारख्या संसर्गाची भीती असताना देखील त्यांना बेघर करण्यात आले आहे .
येथील स्टेशन परिसरात सुमारे पन्नास वर्षापेक्षा अधिक काळापासून रहिवासी येथे राहत होते. े रेल्वे उड्डानपुला मुळे काही कुटुंबाची घरे जाणार आहे, अशी माहिती देऊन बेघर होणाऱ्यांबाबत पर्यायी व्यवस्थेबाबत प्रांतधिकारी, तहसीलदार, बीडीओ, यांच्याकड पाठपुरावा केला असतांनाही अद्याप याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रहिवाशांपुढे आता निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या परिसरातील वृक्षही तोडून रस्ता बंद करण्यात येऊन पर्यायी रस्ता न दिल्याने प्रवाशांचे तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. याचीही दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
पर्यायी जागा मिळण्याची मागणी
शासनाने त्वरित पर्यायी जागा देऊन आमचा प्रश्न तातडीने सोडावा.लॉकडाउन मध्ये आम्हाला घरे सोडावी लागली आह, याचा गांभीर्याने विचार करवा, अशी मागणी रहिवासी राजीव बोरसे, मोहन राठोड, सचिन गुल्हाने, पुंजो मेढे, आशाबाई पवार, गंगूबाई सावळे आदींनी केली आहे.

Web Title: Bulldozers hit 10 houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.