बैल बाजारात वीजतारा ठरताहेत जीवघेण्या
By admin | Published: May 29, 2017 12:53 AM2017-05-29T00:53:16+5:302017-05-29T00:53:16+5:30
वाकोद : वीज वितरण कंपनीने लक्ष देणे गरजेचे, गुरांची मोठय़ा प्रमाणात आवक
वाकोद, ता. जामनेर : संपूर्ण खान्देशात बैलांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या वाकोद येथील बैल बाजारात यंदा बैलांसह इतर जनावरांची आवक मोठय़ा प्रमाणावर झाली आहे. दरम्यान, याच बैल बाजारात वीज वितरण कंपनीच्या अवघ्या पाच-सहा फूट अंतरावरून गेलेल्या विद्युत तारा गुरांसाठी धोकादायक ठरू शकत असल्याचे चित्र आहे. यातून गुरांसोबतच मानवी प्राणहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जून महिन्यात शेतक:यांच्या खरीप हंगामास सुरुवात होत असत़े, त्यामुळे शेतकरीवर्गदेखील बैलांची मोठय़ा प्रमाणावर खरेदी करीत असतात़ दर शनिवारी भरणा:या आठवडे बाजारात शेकडो बैलजोडय़ांसह जनावरे येथे खरेदी विक्रीसाठी दूरवरून येत असतात. लाखो रुपयांच्या घरात गेलेल्या या जनावरांच्या किमतीने या जनावरांना चांगलेच महत्त्व आले आहे.
या मौल्यवान बळीराजाला मात्र वीज वितरण कंपनीचे ग्रहण लागलेले दिसून येत आहे. या बाजाराच्या लोखंडी कुंपणाला लागूनच हाताने स्पर्श करता येईल, अशा अवघ्या पाच ते सहा फूट अंतरावर वर वीज वितरण कंपनीचे विद्युत प्रवाह असलेले तार लोंबकळत आहेत. येथून जवळच ट्रान्सफॉर्मर असून, उच्चदाब वीज प्रवाह असलेले हे तार आहे. या लोंबकळणा:या तारांखाली बाजाराचे लोखंडी तार असलेले ताराचे कुंपण आहे. या कुंपणालाच अनेक बैल जोडय़ांसह जनावरे बांधलेली असतात. हे तार उच्च विद्युत दाबाचे आहेत.
1विद्युत दाब अचानक वाढल्यास किंवा वारा-वादळाने किंवा कोणाच्या धक्क्याने हे तार सहज पडू शकतात. चालू वीजप्रवाह असलेले हे तार खाली पडल्यास सरळ कुंपणावर पडू शकतात.
2यामुळे या तारांचा स्पर्श जनावरांना होऊन मोठी दुर्घटना घडू शकते. मात्र, याचे कोणतेच सोयरेसुतक नसल्याचे दिसून येत आहे. शेतक:यांची संपत्ती म्हणून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
3 बाजारात जनावरांची मोठी गर्दी सध्या बाजारात शेतकरी वर्गाकडून बैलांची मागणी वाढल्याने शनिवारच्या दिवशी बैल बाजारात प्रचंड गर्दी होती.