धुळ्यात कुख्यात गुंड गुड्डयाची भरचौकात गोळी झाडून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 06:08 PM2017-07-18T18:08:33+5:302017-07-18T18:08:33+5:30
धुळ्यातील गोयर परिवाराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल. सीसीटीव्ही फुटेजमुळे झाले आरोपी निष्पन्न.
Next
ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.18- शहरातील कराचीवाला खुंट चौकात मंगळवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रफिकोद्दीन शफिकोद्दीन शेख उर्फ गुड्डया या कुख्यात गुंडाची हत्येतील संशयित आरोपी सीसीटीव्ही फुटेजवरुन निष्पन्न झाले आहेत. हा खून गोयर परिवारातील सदस्यांनी केल्याचा निष्पन्न झाल्याने रवींद्र उर्फ राजा भद्रा देवरे, विक्रम उर्फ विक्की गोयरसह आठ ते दहा जणांविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रारोडवरील कराचीवाला खुंट चौकातील महापालिकेकडे जाणा:या पारोळा रोडवरील चहाच्या दुकानाजवळ पहाटे साडे सहा वाजेच्या सुमारास कुख्यात गुंड गुड्डय़ा उर्फ रफिकोद्दीन शफिकोद्दीन शेख हा काळ्या रंगाच्या स्कुटरवर आला. याठिकाणी आधीच त्याची वाट बसलेल्या 8 ते 10 जणाना तो भेटला. याठिकाणी टोळीतील काही लोकांशी गुड्डयाचा वाद झाला. यावेळी टोळीतील एकाने अचानक त्याच्यावर पिस्तुल रोखली आणि गोळी झाडली़ गोळी लागल्याने गुडय़ा जखमी झाला. दरम्यान, टोळीतील अन्य लोकांनी त्याच्यावर तलवार व चॉपरने सपासप वार केल़े गंभीररित्या जखमी झाल्याने गुड्डया जमिनीवर कोसळला. त्याचा मृत्यू झाल्याची खात्री केल्यानंतर हल्लेखोर आग्रारोडर्पयत पायी गेले. त्याठिकाणी उभ्या केलेल्या एका गाडीत बसून ते पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.
रोज पहाटे मॉर्निग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना या घटनेमुळे धक्का बसला. भरचौकात अवघ्या काही मिनिटात घडलेला थरार पाहून स्तब्ध झाल़े तर घटनेनंतर ही बातमी वा:यासारखी शहरात पसरल्याने घटनास्थळी एकच गर्दी उसळली होती.
याप्रकरणी शेख फारुक फत्तू फौजी (46) रा़ जामा मशिद, धुळे यांनी मंगळवारी धुळे शहर पोलिसात दुपारी फिर्याद दिली. त्यानुसार रवींद्र उर्फ राजा भद्रा देवरे, विक्रम उर्फ विक्की गोयर, विलास उर्फ छोटा पापा श्याम गोयर, भीमा रमेश देवरे, दादू रमेश देवरे, श्याम गोयर आणि अन्य तीन ते चार जण यांच्यावर संशय व्यक्त केला आह़े त्यांच्याविरुध्द भादंवि कलम 302, 504, 506, 120 ब आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल झाला आह़े
गुड्डयावर 35 गुन्हे दाखल होते
मयत गुड्डया याच्यावर धुळे शहरासह कोपरगाव व अन्य ठिकाणी वेगवेगळ्या कलमान्वये 35 गुन्हे दाखल आहेत़ तो मनपा जळीतकांडातील प्रमुख संशयित आरोपी होता. त्या जळीतकांडापासूनच तो जास्त प्रकाशझोतात आला होता. त्याची शहरातील व्यापा:यांमध्येही दहशत होती.
रफिकोद्दीन शेख उर्फ गुडय़ा याचा सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान खून करण्यात आला़ यात पिस्तुल आणि तलवारीने हल्ला झाला आह़े यात जखमी झालेल्या गुडय़ाचा मृत्यू ओढवला़ त्याच्या विरुध्द विविध पोलीस ठाण्यात 35 गुन्हे दाखल आहेत़ हल्ला करत असताना या भागात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरुन आणि प्राथमिक तपासात काही माहिती समोर आली आह़े गोयर परिवारातील सदस्य या फुटेजमध्ये दिसत असल्याने त्यांच्यावर संशय आह़े त्यांच्या तपासासाठी तातडीने पाच पथक तयार केले असून लवकरच आरोपी ताब्यात घेण्यात येतील.
- विवेक पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक.