जळगाव जिल्ह्यातील ५ हजार हेक्टरवर बोंडअळीचा जोरदार हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 10:17 PM2018-08-10T22:17:01+5:302018-08-10T22:19:17+5:30
जिल्ह्यात २९ जुलै पासून तब्बल १३ दिवस पावसाने खंड दिल्याने पिकांवरील किडरोगांमध्ये वाढ झाली असून कपाशीवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
Next
ठळक मुद्देपावसाचा खंड पडल्याने वाढले प्रमाणआर्थिक नुकसान होण्याची शक्यता अधिकपिकांवरील किडरोगांमध्ये झाली वाढ
जळगाव : जिल्ह्यात २९ जुलै पासून तब्बल १३ दिवस पावसाने खंड दिल्याने पिकांवरील किडरोगांमध्ये वाढ झाली असून कपाशीवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. ५ हजार हेक्टर क्षेत्रावरील प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर गेला असल्याची नोंद कृषी विभागाच्या दप्तरी झाली आहे.
मागील वर्षी बोंडअळीमुळे कपाशीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे कपाशीच्या ५ लाख १० हजार ९१३ हेक्टर क्षेत्रापैकी यंदा ४ लाख ८६ हजार ७६१ हेक्टर क्षेत्रावरच म्हणजेच ९५.२७ टक्के क्षेत्रावरच यंदा कपाशीची लागवड झाली आहे. तसेच जनजागृतीही सुरू आहे. मात्र तरीही कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे.