इंद्रप्रस्थनागरात घरफोडी

By admin | Published: January 9, 2017 12:07 AM2017-01-09T00:07:34+5:302017-01-09T00:07:34+5:30

इंद्रप्रस्थनगरात जितेंद्र प्रकाश जोशी या पापड विक्रेत्याच्या स्वयंपाक घराचा दरवाजा उघडून चोरटय़ांनी 18 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

Burglar in Indraprastha Nagar | इंद्रप्रस्थनागरात घरफोडी

इंद्रप्रस्थनागरात घरफोडी

Next


जळगाव : शहरात चोरी व घरफोडीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले आहे. सिध्दी विनायक कॉलनीत दीड लाखाची घरफोडी झाल्याची घटना ताजी असतानाच इंद्रप्रस्थनगरातही जितेंद्र प्रकाश जोशी या पापड विक्रेत्याच्या स्वयंपाक घराचा दरवाजा उघडून चोरटय़ांनी 18 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र जोशी हे इंद्रप्रस्थनगरात विलास रुपचंद बडगुजर यांच्या घरात प}ी लिना व आई प्रतिभा यांच्या समवेत भाडय़ाने राहतात. शनिवारी संध्याकाळी आई प्रतिभा या दादावाडीत अंजू देवरे यांच्याकडे तर प}ी दवाखान्यात कामावर गेल्या होत्या.
जोशी हे व्यवसायानिमित्त बाहेर होते. सर्व जण संध्याकाळी                              घरी आले. जेवण झाल्यानंतर                झोपले. यावेळी स्वयंपाक घराचा दरवाजा बंद करताना विसर                  पडला. घरातील सोफ्यावर                   प}ीची पर्स ठेवलेली होती. त्यात दोन हजार रुपये रोख, 12 हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र व तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल असा 18 हजाराचा ऐवज होता.
सकाळी उठून पाहिले तर सोफ्यावरील पर्स गायब होती तर घरातील काही सामान अस्ताव्यस्त पडलेला होता. बाहेर पर्समधील कागदपत्रे फेकलेली होती. यावरुन घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. स्वयंपाक घराचा दरवाजा उघडा असल्याने चोरटय़ांनी त्याच दरवाजातून येवून ही पर्स लांबविली.
दरम्यान, या आठवडय़ात घरफोडीची ही दुसरी घटना आहे. गेल्या महिन्यात सरत्या वर्षी दंगलग्रस्त कॉलनीत 21 लाखाची धाडसी घरफोडी झाली होती.

महावीर नगरातून दुचाकी लंपास
महावीर नगरात राहणारे जयेश गोंबीलाल लाठीमार (वय 48) यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.19 बी.डी.7868) चोरटय़ांनी 28 डिसेंबर रोजी त्यांच्याच घराजवळून लांबवली आहे. याप्रकरणी रविवारी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
 

Web Title: Burglar in Indraprastha Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.