रावेर तालुक्यातील खानापूर येथे घरफोडी, दीड ते पावणे दोन लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 01:06 PM2018-07-22T13:06:03+5:302018-07-22T13:07:03+5:30

साखरपुड्यात आलेले दागिने लंपास

A burglar at Khanapur in Raver taluka, one to one and a half lakh lapsed | रावेर तालुक्यातील खानापूर येथे घरफोडी, दीड ते पावणे दोन लाखाचा ऐवज लंपास

रावेर तालुक्यातील खानापूर येथे घरफोडी, दीड ते पावणे दोन लाखाचा ऐवज लंपास

Next
ठळक मुद्दे१५ हजार रूपयांची चिल्लर लंपास खिडकीचे गज कापून व आतील खोलीचा कडीकोयंडा तोडून घरफोडी

रावेर, जि. जळगाव : तालुक्यातील खानापूर येथील लेंडीनाल्यालगतच्या घमा महाजन यांच्या प्लॉटमधील देशी दारू दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वायर कापून डीव्हीआर तथा एलईडी टीव्ही व १५ हजार रूपयांची चिल्लर लंपास करण्यासह शखे शरीफ शेख कल्लू यांच्या घरात चोरी करीत साखरपुड्यात आलेले दागिने व रोख रक्कम असा अंदाजे दीड ते पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
खानापूर येथील घमा महाजन यांच्या प्लॉटमधील नवीन वसाहतीत असलेल्या शेख खलील यांच्या मालकीच्या देशी दारूच्या दुकानात व समोर लावलेल्या चार ते पाच सीसीटीव्ही कॅमेºयांचे संयोजन तोडून व दुकानात घरफोडी करून १५ हजार रुपयेची चिल्लर रोकड, एक एलईडी टीव्ही, सीसीटीव्ही कॅमे-यांचे रेकॉर्डिंग असलेले डीव्हीआर लंपास केला. त्यानंतर त्यांनी दुकानालगतचे तारकुंपण कटरने कापून माजी सरपंच विनोद वाघ व प्रमोद वाघ यांच्या शेतातून मार्ग काढून शेख शरीफ शेख कल्लू यांच्या घराच्या मागील भिंतीवरील खिडकीचे गज कापून व आतील खोलीचा कडीकोयंडा तोडून घरफोडी केली. त्यात लोखंडी कपाटातील दागिने व रोकड असलेला अ‍ॅल्युमिनीयमचा डबा, एक साड्यांची भरलेली बॅग बाहेर अस्ताव्यस्त फेकून, त्यातील तीन तोळ््याचे सोन्याचे दोन नेकलेस हार, इतर सोन्याचे दागिने व २३ हजार रू रोख रोकड असा दोन्ही ठिकाणचा अंदाजे दीड ते पाऊणे दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली.

Web Title: A burglar at Khanapur in Raver taluka, one to one and a half lakh lapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.