जळगावातील मकरंद कॉलनीत घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:38 PM2019-02-24T12:38:30+5:302019-02-24T12:43:23+5:30
मकरंद कॉलनीतील राजू अशोक गुरव यांच्या बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी एक लाख रुपये रोख, ६० हजाराचे सोन्याचे दागिने तर ४० हजाराचे चांदीचे दागिने लांबविल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी लोखंडी व लाकडी दरवाजाचे कुलुप व कडीकोयंडा तोडून धुडगूस घातला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोख रक्कम ही राजू यांचे मावस भाऊ प्रतिक याच्या लग्नाची होती.
जळगाव : मकरंद कॉलनीतील राजू अशोक गुरव यांच्या बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी एक लाख रुपये रोख, ६० हजाराचे सोन्याचे दागिने तर ४० हजाराचे चांदीचे दागिने लांबविल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी लोखंडी व लाकडी दरवाजाचे कुलुप व कडीकोयंडा तोडून धुडगूस घातला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोख रक्कम ही राजू यांचे मावस भाऊ प्रतिक याच्या लग्नाची होती.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मकरंद कॉलनीतराजू अशोक गुरव हे आई नलिनी, पत्नी वैशाली व आजी कोकीळाबाई प्रल्हाद गुरव यांच्यासह वास्तव्याला आहेत. राजू यांचा मावसभाऊ प्रतिक देवरे याचे मागील आठवड्यात जळगावात लग्न झाले. या लग्नाची जबाबदारी राजू यांच्यावरच होती. २० फेब्रुवारी रोजी मुंबईत लग्नाचे रिसेप्शन होते. त्यामुळे गुरव परिवार १९ रोजी रात्रीच मुबंईला गेले होते. तेथून शनिवारी रात्री संपूर्ण परिवार जळगावकडे रवाना झाला. रविवारी सकाळी सात वाजताच ते घरी आले असता वॉलकंपाऊडचे लोखंडी गेट व आतमधील लाकडी दरवाजा या दोघांचे कुलूप तुटलेले होते तर घरात साहित्याची नासधूस केलेली होती.
दोन कपाटाचे कुलुप तोडले
घरात पाहणी केली असता दोन्ही बेडरुममधील कपाटाचे कुलुप चोरट्यांनी तोडले आहेत. त्यातील एक लाख रुपये रोख, २० ग्रॅम सोन्याचे दागिने (अंगठी व कानातील टॉप्स), १५ भार चांदी व इतर असा ऐवज गायब झालेला होता.घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान पथकाला कुलुप सुंगवले असता त्याने महाबळ कॉलनीच्या दिशेने दोनशे मीटरपर्यंत माग दाखविला.