कुसुंब्यात दोन ठिकाणी घरफोडी, दुचाकीसह अडीच लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 06:39 PM2018-02-04T18:39:13+5:302018-02-04T18:48:39+5:30
चोपडा तालुक्यातील कुसुंबा येथे शनिवारी रात्री एका शेतकºयाच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारत अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. दुसºया घरातही त्यांनी हैदोस घातला परंतु त्यांच्या हाती काहीही लागले नाही. मात्र तिसºया रहिवाशाची नवी कोरी दुचाकी लांबवून पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे.
आॅनलाईन लोकमत
चोपडा, दि.४ : तालुक्यातील कुुसुंबा येथे शनिवारी रात्री चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी करून सोन्या- चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह दोन लाख चाळीस हजाराचा ऐवज लंपास केला. दुसºया घरातही चोरट्यांनी हैदोस घातला मात्र त्यांच्या हाती काहीही लागले नाही. चोरट्यांनी या घराच्या शेजारी असलेल्या एका रहिवाशाची नवीन दुचाकी घेऊन पोबारा केला.
पोलीस सूत्रानुसार, ३ रोजी रात्री ८ ते ४ रोजी पहाटे १:३० वाजेच्या दरम्यान शरद ओंकार पाटील यांच्या घराच्या दरवाजाचे कडी कोंडा कटरने तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील दोन लोखंडी कपाट तोडून त्यातील सामान अस्ताव्यस्त केला. तसेच शोकेसमधील लॉकरमध्ये ठेवलेले ४० ग्रॅम सोन्याच्या पाटल्या, १५ ग्रॅम वजनाचा चपला हार, एक ग्रॅम सोन्याचा तुकडा, पाच ग्रॅमच्या चार सोन्याच्या अंगठ्या, पाच ग्रॅमचे टोंगल, चार हजार रुपये किंमतीचे २०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दोन तोडे व रोख १५ हजार असा एकूण एक लाख ऐंशी हजाराचा ऐवज लंपास केला.
तसेच श्यामकांत पंढरीनाथ पाटील यांच्या घराच्या दरवाजाच्या कडीकोंडा तोडून घरात असलेल्या कपाटातील व डब्यामधील साहित्य अस्ताव्यस्त फेकले मात्र येथून चोरट्यांच्या हातात कोणत्याही मौल्यवान वस्तू लागल्या नाहीत.
चोरट्यांनी या घराच्या शेजारील रहिवासी वैभव रंगराज पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वी विकत घेतलेली साठ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची दुचाकी (क्रमांक एम एच १९ डी सी ५२४९) लंपास केली.
याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला शरद ओंकार पाटील (५०) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भाग ५ गु र नं ५/२०१८ भादंवि ४५४, ४५७ ,३७९ , ५११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक भिमराव नंदूरकर हे करीत आहेत.
लोडशेडींगमुळ चोरट्यांचे फावले
ग्रामीण भागात सद्या शेतीपंपासाठी लोडशेडींगमुळे दिवसा वीजपुरवठा न देता रात्री उशिरा वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे शेतकºयांना रात्री पिकांना पाणी भरण्यासाठी जावे लागते. ज्यांच्या घरात चोरी झाली ते शरद पाटील हरभरा पिकाला पाणी भरण्यासाठी रात्री आठ वाजता घरून गेले होते. दीड वाजता ते शेतातून घरी परतल्यावर त्यांना दरवाजा उघडा दिसला. रात्री ८ ते दीड वाजेच्या दरम्यान ते शेतात असताना चोरट्यांनी त्यांच्या घरातील सोने, चांदीचे दागिने व रोख रकमेवर डल्ला मारला.