अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या कुटुंबीयांकडे घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:17 AM2020-01-13T00:17:31+5:302020-01-13T00:19:17+5:30

जामनेर , जि.जळगाव : येथील डोंगरेजी महाराजनगरमधील बंद घर चोरट्यांनी फोडून तीन लाख ६५ हजार रोख व सव्वा लाखाचे ...

Burglary to family members who went to the funeral home | अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या कुटुंबीयांकडे घरफोडी

अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या कुटुंबीयांकडे घरफोडी

Next
ठळक मुद्देजामनेर येथे चोरट्यांनी लांबविला पाच लाखांचा ऐवजघराचा दरवाजा उघडा





जामनेर, जि.जळगाव : येथील डोंगरेजी महाराजनगरमधील बंद घर चोरट्यांनी फोडून तीन लाख ६५ हजार रोख व सव्वा लाखाचे दागिने असा सुमारे पाच लाखाचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. धर्मराज गोपीचंद पाटील यांचे ३ रोजी अपघाती निधन झाल्याने कुटुंबीय कलाली, ता.अमळनेर येथे अंत्यविधीसाठी गेले होते. आज त्यांचा दशक्रिया विधी झाला. दरम्यानच्या काळात घर बंद होते.
रविवारी सकाळी दूध वाटप करणाऱ्याने पाटील यांच्या शेजाऱ्यांना विचारले की, पाटील कुटुंबीय आले का? तर त्यांनी नाही म्हणताच त्याने सांगितले की घराचा दरवाजा उघडा दिसत आहे. शेजाºयांनी ही माहिती धर्मराज यांच्या परिचितांमार्फत नातेवाईकांना कळवली. धर्मराज यांचे चुलत सासरे मधुकर पवार यांनी जामनेरला येऊन पाहणी केली असता चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरुमच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील ३ लाख ६५ हजाराची रोकड, १ लाख ३० हजाराचे सोन्याचे दागिने असा चार लाख ९५ हजारांचा एवज चोरुन नेल्याचे आढळून आले. पवार यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांंविरुध्द गुन्हा दाखल केला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश काळे करीत आहे.

Web Title: Burglary to family members who went to the funeral home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.