क्रीडा अधिकारी उद्घाटन सभारंभात असताना चोरट्यांडून घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:40 AM2021-01-13T04:40:54+5:302021-01-13T04:40:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : क्रीडा अधिकारी सुजाता गंगाधर चव्हाण (५२) या युवा सप्ताहांतर्गत युवा दिनानिमित्त मू.जे.महाविद्यालयात शासकीय कार्यक्रमाच्या ...

Burglary by thieves while sports officials at the inauguration ceremony | क्रीडा अधिकारी उद्घाटन सभारंभात असताना चोरट्यांडून घरफोडी

क्रीडा अधिकारी उद्घाटन सभारंभात असताना चोरट्यांडून घरफोडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : क्रीडा अधिकारी सुजाता गंगाधर चव्हाण (५२) या युवा सप्ताहांतर्गत युवा दिनानिमित्त मू.जे.महाविद्यालयात शासकीय कार्यक्रमाच्या उद‌्घाटन समारंभात असतानाच दुसरीकडे त्याच वेळी त्यांच्या जिल्हा परिषद कॉलनीतील निवासस्थानात दोन लाखाची घरफोडी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी सायंकाळी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळ धुळ्याच्या रहिवाशी असलेल्या सुजाता चव्हाण या जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयात क्रीडा अधिकारी पदावर कार्यरत आहेत. पती राजेंद्र हनुमंत चव्हाण हे सेवानिवृत्त झालेले आहेत. जिल्हा परिषद कॉलनीत माजी जिल्हा परिषद सदस्या उषा बाळासाहेब परखड यांच्या मालकीच्या घरात भाड्याने वास्तव्याला आहेत. मंगळवारी युवा सप्ताहांतर्गत युवा दिनानिमित्त मू.जे.महाविद्यालयात शासकीय कार्यक्रमाचे उद‌्घाटन असल्याने त्या पतीसह सकाळी १०.१५ वाजता घरुन निघाल्या. कार्यक्रम संपल्यानंतर त्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात गेले. तेथून ३.४५ वाजता जेवणासाठी घरी आल्या असता घराचा दरवाजा अर्धवट उघडा होता तर पंखा सुरुच होता. बेडरुमधील कपाटाचे ड्रावर पलंगावर पडलेले होते. तसेच ड्रावरमधील सोन्याचे दागिने गायब झाले होते. त्यात ४० हजार रुपये किंमतीची ८ ग्रॅमची सोन्याची अंगठी, १ लाख रुपये किंमतीच्या दहा ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या, ५० हजार रुपये किमतीची १० ग्रॅमची एक सोन्याची अंगठी, ३ हजार रुपये किमतीची सोन्याची एक नथ व १ हजार रुपये किमतीची चांदीची अंगठी असा १ लाख ९३ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे उघड झाले.

दरम्यान, या घटनेनंतर सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, जिल्हा पेठचे निरीक्षक विलास शेंडे, सहायक निरीक्षक महेंद्र वाघमारे व महेंद्र बागुल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी व पंचनामा केला.

Web Title: Burglary by thieves while sports officials at the inauguration ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.